file photo
file photo 
नांदेड

अर्धापूर गटविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी पं. स. सदस्यांचा बहिष्कार

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारच्या निषेधार्थ व त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार मंगळवारी (ता. नऊ ) घातला. तसेच मागणी मान्य होईपर्यंत सर्वच बैठकांवर बहिष्कार घालन्यात येईल अशी माहिती उपसभापती अशोक कपाटे यांनी दिली. तसेच पालकमंत्री अशोक चव्हाण यांची लवकरच भेट घेवून कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

अर्धापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिना रायतळे व सभापती कांताबाई सावंत, उपसभापती अशोक कपाटे, माजी सभापती मंगल स्वामी यांच्यात समन्वय नसल्यामुळे खटके उडत आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, संगिता आटकोरे यांनी जिल्हा परिषदेच्या आमसभेत गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करुन कार्यवाही मागणी केली.

अर्धापूर पंचायत समितीची तहकूब झाली. सभा पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी सभापती कांताबाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली.  शिवसेनाचे उपसभापती अशोक कपाटे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव मांडला. या ठरावाला माजी सभापती मंगला स्वामी यांनी अनुमोदन दिले. पण ही तहकूब सभा आसल्यामुळे हा ठराव घेता येत नाही असे गटविकास अधिकारी मिना रायतळे यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी बैठवर बहिष्कार घालून सभात्याग केला.तसेच गटविकास अधिका-यांच्या मनमानी कारभारचा निषेध केला.
या बैठकीनंतर उपसभापतींच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन अशोक कपाटे यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, माजी सरपंच अशोक सावंत, शिवलिंग स्वमी, सदाशिव इंगळे आदी उपस्थित होते. पत्रकाराशी संवाद साधतांना उपसभापती अशोक कपाटे म्हणाले की, गटविकास अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे. सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले जात नाही घरकुल, शौचालय आदी कामें वेळेवर होत नाहीत तसेच  सरळ कामासाठी चिरिमीरे द्यावी लागते असा आरोप त्यांनी केला. तसेच बैठकीवर बहिष्कार घालण्यात आल्याची माहिती दिली. यापुढे वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल आशी माहिती कपाटे यांनी दिली.
पंचायत समितीमध्ये माझ्या टेबलावर कोणतीच फाईल पेन्डीग नाही. सर्व कामे नियमाप्रमाणे करण्यात येत आहेत. तहकूब सभेत सक्तीच्या रजेचा विषय घेता येत नाहीत. माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात येत आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी मिना रायतळे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT