NND05KJP02.jpg 
नांदेड

वर्ल्ड मराठा ऑर्गनायजेशनचा कोरोना विरुद्ध असाही लढा 

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी अनेकजन वेगवेगळ्या पद्धतीने लढाइ लढत आहेत. नांदेड शहरातही वर्ल्ड मराठा ऑर्गनायजेशन परिवाराकडून शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्संना रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या जिवनसत्व ‘क’च्या गोळ्यांचे वाटप मंगळवारी (ता. चार) करण्यात आले.

अनेकांचा कोरोना लढ्यात सहभाग
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग संकटात सापडले आहे. यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. तर यात बाधीतांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना लवकर होत असल्याने यात वर्ल्ड मराठा ऑर्गनायजेशनचे योगदान असावे, यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या जीवनसत्व ‘क’ भरपूर प्रमाणात असलेल्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

कोरोना वारियर्सना गोळ्यांचे वाटप
या गोळ्या भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, वजिराबाद, इतवारा, सिडको ग्रामीण, गुन्हे अन्वेशन शाखा वजिराबाद,  जिल्हा विशेष शाखा, वायरलेस डिपार्टमेंट, पत्रकार, आरोग्य कर्मचारी यांना वाटप केल्या आहेत. या कामासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायजेशन नांदेड परिवारामधील ५९ बांधवांचे सहकार्य लाभले. या कार्यामध्ये आपल्या समूहाचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ, महेश गव्हाणे (ओमान), श्जितेंद्र पवार (टांझानीया) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत देशमुख, दीपिका सूर्यवंशी, अजय पाटील, वैभव देशमुख, दत्ता पवार, नवीन पाटील, तृप्ती वाळुंज-पाटील यांचे सहकार्य लाभले.

श्री गुरुजी रुग्णालयाकडून पोलीसांची मोफत तपासणी
संपूर्ण जग करोनाशी लढत असतांना लॉकडाउनमध्ये सर्व लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत व त्याच सोबत त्यांची सुरक्षा व इतर बंदोबस्त अशा अनेक आघाडीवर कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी चोविसतास सेवा देत आहेत या काळात शारीरिक, मानसिक तणावासह नांदेडच्या तळपत्या उन्हाची पर्वा न करता हे बांधव आपली सेवा बजावत आहेत

मधुमेह, रक्तदाब, ईसीजीची होणार तपासणी
या सर्व कोरोना वारीयर्सचा भाग असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे श्री गुरुजी रुग्णालयाने ठरवले आहे. या सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणीमध्ये मधुमेह, रक्तदाब, ईसीजी व फिजिशियनचा सल्ला देण्यात येणार आहे. ही आरोग्य तपासणी ता. पाच ते ता. २० मे २०२० या कालावधीत रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत श्रीगुरुजी रुग्णालयात येऊन सर्व पोलीसांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीगुरुजी रुग्णालयाच्या संचालक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT