file photo 
नांदेड

अत्याचार व खून प्रकरण : आक्रोश मोर्चामुळे बिलोली शहर कडकडीत बंद, तीन तास रास्ता रोको 

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) ः शहरातील २७ वर्षीय अविवाहित तरुणीवर झालेल्या अत्याचार व खूनाच्या निषेधार्थ मातंग समाजासह सर्व पक्ष व सर्व धर्मियांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खून करणाऱ्या आरोपींचा व मुख्य सूत्रधार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.


बिलोली शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या २७ वर्षीय अविवाहित तरुणीवर बलात्कार करून तिचा निर्दयपणे दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेमुळे बिलोली शहरासह तालुक्यात जबर हादरा बसला आहे. मागच्या वर्षीही याच भागातील एका युवतीचा मृतदेह नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेकून देण्यात आला होता. मात्र त्या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. शहरात अशी दुसऱ्यांदा घटना घडल्यामुळे सर्व धर्माच्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा - परभणी : नऊ महिण्यानंतर ग्रंथालयांना विस टक्केच अनूदान मिळाले.

महिला व पुरुष या मोर्चात सहभागी
दरम्यान बिलोली येथील घटनेतील आरोपींचा शोध घेऊन मुख्य सूत्रधाराला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील साठेनगर पासून गांधी चौक व तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांसह सर्व जाती धर्मातील असंख्य महिला व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी आमदार रावसाहेब अंतापूरकर, नगराध्यक्ष मारुती पटाईत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, संतोष कुलकर्णी, विजयकुमार कुंचनवार, उत्तम जेठे, संदीप कटारे, भालेराव गुरुजी, लोहबंदे मुखेडकर, मुकंदर कुडके, गंगाधर कुडके, शेख सुलेमान, वलियोद्दीन फारुकी, नगरसेवक अरुण उप्पलवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सूर्कुटलावर, चौधरी मॅडम, माधुरी फुलारीसह महिलांची लक्षणीय उपस्थिती यावेळी होती. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात केली असली तरीही या घटनेचा मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपी अद्याप अटक झाला नसल्याचा आक्षेप मयत मुलीच्या नातेवाईकांनी घेतला आहे. प्रकरण शांत करण्यासाठी पोलिसांनी चोराला सोडून संन्याशाला फाशी होईल असे वर्तन करू नये. घटनेतील मुख्य आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करावेत व या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणीही उपस्थितांनी केली आहे. मोर्चेकऱ्यांनी मागण्याचे निवेदन तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना दिली असून पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी या घटनेचा छडा लावण्याचे आश्वासनही दिले. मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती त्यामुळे पोलिसांच्या कृतीचा यावेळी निषेध करण्यात आला.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT