valur.jpg
valur.jpg 
नांदेड

अवैध वाळू वाहतुकीला आशीर्वाद कुणाचे ?

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः सध्या धर्माबाद तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक हा एक फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीपात्र व हुनगुंदा वांजरा नदीपात्र या ठिकाणचे वाळू लिलाव झालेले नाहीत. तेथील पात्रातील वाळू रात्रीच्या वेळी उपसा करून त्यांची अवैध मार्गाने विक्री करून अव्वाच्या सव्वा पैसे कमावले जात आहेत. अवैध पैशांच्या माध्यमातून वाळू माफिया गब्बर झाले आहेत. काळ्या पैशाच्या जोरावर ते कायदा हातात घेत आहेत. वाळू संबंधात नियंत्रण ठेवणाऱ्या महसूल यंत्रणेला ते जणू ‘किस झाड की पत्ती’ समजतात. अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेलाही ते घाबरत नाहीत. धर्माबादेत अवैध वाळू वाहतुकीने धुमाकूळ घातला. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला आशीर्वाद कुणाचे? हा खरा प्रश्न अनुत्तरित आहे.


धर्माबाद शहरात हैदोस
कोरोना आजाराने देशात थैमान घातले आहे. प्रशासनातील महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या जबाबदाऱ्या असून यंत्रणा कामात असल्याचे पाहून तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून व हुनगुंदा वांजरा नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून मनूर, बामणी, सिरसखोड मार्ग धर्माबाद शहरात हैदोस घालत आहेत.

यासंबंधी ‘सकाळ’ने मालिका प्रकाशीत केली. बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, माचनूर, गंजगाव येथील वाळू वांजरा नदीपात्राचा व धर्माबाद तालुक्यातील संगम, मनूर, नेरली, बामणी, विळेगाव (थडी), मोकली, रामपूर, चोंडी, आटाळा, पाटोदा, या परिसरातील गोदावरी नदीतील वाळू पात्राचा लिलाव झाला नसतांना अवैध वाळू भरली जाते, हे कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय शक्य आहे काय? वाळू चोरट्यांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात शंकरगंज येथे अवैध वाळू वाहतुकीचा एक ट्रॅक्टर नागरिकांनी पकडला व महसूल अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. तहसीलदार यांच्या आदेशावरून कारवाई करण्यात आली. तरीपण अजूनही टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक जोमाने सुरू आहे.

संगम येथील वाळू साठ्यावर कारवाई
तालुक्यातील गोदावरी नदीपात्र व हुनगुंदा वांजरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून धर्माबादेत वाळू चोरटे धुमाकूळ घातला आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने मालिका प्रकाशीत केली होती. या बातम्यांची दखल तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी घेतली असून तालुक्यातील संगम येथील वाळू साठ्यावर छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी २५ ते ३० ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (ता. चार) दुपारी तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी केली. यामुळे अवैध वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

दोन दिवसांपासून महसूलचे फिरते पथक चालू आहे. संगम येथील वाळू साठ्यावर कारवाई केली आहे. अवैध वाळू संदर्भात सर्व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. आता तर वाळू वाहतूक करतांना कुणी सापडले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास तहसीलदार यांना सांगितले आहे.
- राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी, धर्माबाद.

 

वाळू वाहतूक करणाऱ्या अनेक ठिकाणी जेसीबीने खोदकाम करून रस्ता बंद करण्यात आला आहे. संगम येथे २५ ते ३० ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. प्रशासन कोरोनाच्या कामात व्यस्त असल्यामुळे वाळू चोरटे याचा फायदा घेत आहेत. रात्रीला पथकाच्या फेऱ्या वाढवून घेऊन यापुढे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रय शिंदे, तहसीलदार, धर्माबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT