Navratri 2022
Navratri 2022  esakal
नवरात्र

Navratri 2022 : शक्तीचे अखंड रूप असलेली नवदुर्गा श्री लक्ष्मी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोल्हापूरातील शाहू क्लॉथ मार्केट समोर मटण मार्केट शेजारी महाराष्ट्र शासनाचे वजन-मापे कार्यालयाच्या परिसरामध्ये श्री लक्ष्मी देवीचे हे प्राचीन मंदीर आहे.नवदुर्गा परिक्रमेतील नववी देवी श्री लक्ष्मी आहे. सर्वसामान्य स्त्री देवता म्हणजे देवी असा समज आहे. शिवपत्नी पार्वतीदेखील देवी म्हणून ओळखली जाते. नवदुर्गापैकी एक दुर्गा म्हणून प्रसिद्ध असलेली श्री लक्ष्मी दोन हात उंचीची बैठी मूर्ती आहे. मूर्ती चर्तुभुज असून सुंदर आहे. मूर्तीला अनेक भक्तांनी शेंदूरलेपन केले आहे. मूर्तीजवळ दगडामध्ये कोरलेले दोन हत्ती आहेत.

सर्व ऐतिहासिक, परलौकीक संपत्तीचे निर्मळ सागरस्वरूप देवता आहे. संपदा म्हणजे श्रीलक्ष्मी. ती सात्विक गुणांची प्रेरकशक्ती आहे. मायाशक्तीची व लक्ष्मी दोहांचे अखंड रूप म्हणजे लक्ष्मी देवी होय. अर्धनारी नटेश्वर हे रूप शिवशक्तीचे अखंडता आहे. विष्णू व शक्तीचे अखंड रूप म्हणजे श्रीलक्ष्मी. त्यामुळे देवतेच्या रूपामध्ये लक्ष्मीरूप आढळते. श्रावणमास व आश्वीनमासामध्ये अनेक भक्त याठिकाणी येतात.

पार्वती, उमा, गौरी, हरतालीका, जगदंबा अशी तिची विविध रूपे, तथापी दुष्टांच्या संहारासाठी ती चामुंडा, भैरवी अशा नावाने ओळखली जावू लागली. भद्रकाली, खतदंतीका हे तिचे उग्ररूप आहे. तर लक्ष्मी हे तिचे सात्विक व वैभवशाली रूप आहे. या देवीचे पूजन सर्वसुखभोग देणारे व मुक्ती देणारे आहे.अशी माहिती इतिहास अभ्यासक शरद तांबट यांच्या करवीर नवदुर्गा या पुस्तकात आहे.

या आहेत नवदुर्गा

कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनासोबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT