16 lakh goat found in 24 hours in sangli
16 lakh goat found in 24 hours in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सोळा लाखाचा चोरी गेलेला बकरा सापडला अवघ्या चोवीस चोवीस तासात 

नागेश गायकवाड

आटपाडी (सांगली) : येथील आंबेबन मळ्यातील शेतकरी सोमनाथ जाधव यांचा सहा महिन्यांच्या सोळा लाख रुपये किमतीचा चोरी गेलेल्या बकऱ्याचा अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी छडा लावला. कराड येथून बकरा आणि चोरून नेणाऱ्या आटपाडीतील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

  आटपाडी कार्तिक महिन्यात दरवर्षी होणारे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा यावर्षी रद्द केली होती. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरवला होता. या बाजारांमध्ये सांगोला येथील शेतकऱ्याचा दीड कोटी रुपये किमतीचा मोदी बकरा सर्वांचे आकर्षण ठरला होता. या बकऱ्याचे पिल्लू सोमनाथ जाधव यांनी खरेदी केले होते. त्यांनीही  हा सहा महिन्याचा बकरा बाजारामध्ये आणला होता. त्याला पंधरा लाखाची मागणी झाली होती. हे दोन बकरे राज्यभर गाजले होते.       
सोमनाथ जाधव हे येथील आंबेबन मळ्यात कुटुंबीयांसोबत राहतात. दोन दिवसापूर्वी मध्यरात्री त्यांच्या मेंढ्या वाड्यातून अज्ञात चोरट्यांनी वॅगनारगाडी मध्ये बकरा टाकून अज्ञात चोरट्यांनी पळून नेला होता. आटपाडी शहरातील जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ही वॅगनार गाडी जाताना चित्रीकरण झाले होते. त्या गाडीचा तपास आणि माहिती घेऊन पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते.

सुरुवातीला या संशयित आरोपींनी हात वर केले होते मात्र पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. या तीन संशयित आरोपीनी मध्यरात्री वॅगनार गाडी मध्ये बकरा टाकून कराड येथील डोंगरावर नेहून ठेवला होता. तेथून बकरा पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच व्हॅगनार गाडी आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अवघ्या चोवीस तासात चोरी गेलेल्या बकऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाल्याने पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.  

संपादन- अर्चना बनगे   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT