Sarki Oil
Sarki Oil sakal
पश्चिम महाराष्ट्र

तेलघाण्यांना येणार अच्छे दिन : सांगली, कोल्हापुरात सरकी नंबर वन

विष्णू मोहिते

सांगली : खाद्यतेलात सर्वाधिक खपाचे तेल म्हणून, गेली २० वर्षे सरकी तेल आजही पहिल्या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे तेल अशी सरकीची सांगली, कोल्हापूर (Sangli,Kolhapur) जिल्ह्यात ओळख आहे. त्याच दरात उपलब्ध असलेल्या सोयाबीन तेलाकडे, मात्र सांगलीकरांनी पाठ फिरवली आहे. सरकी व शेंगतेलात किलोला ३० ते ५० रुपये, तर सरकी व सूर्यफूल( Sarki Oil) दरात २० ते २५ रुपयांचा किलोला फरक होता. गेल्या सहा महिन्यांत हा फरक कमी झाल्यामुळे आता ग्राहक अन्य तेल खरेदीकडे वळला आहे.

२००१ पर्यंत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांचा फिल्टर शेंगतेलाकडे ओढा कायम होता. त्यानंतर परिस्थितीत मात्र झपाट्याने बदलली. सर्वसामान्य ग्राहक सरकीकडे, श्रीमंत वर्ग सूर्यफुलाकडे; तर आरोग्यांची काळजी करणारे लोक शेंगतेल खरेदी करत होते. ही परिस्थिती जून-जुलै २०२१ पर्यंत कायम होती. गेल्या तीन महिन्यांपासून तेलाच्या दरातील तफावत कमी झाली आहे. यामुळे आता ग्राहक सरकीकडून अन्य तेलांकडे वळतो आहे.

इंधन, गॅस दरवाढीने लोक त्रस्त झालेले असताना गेल्या दोन महिन्यांत खाद्यतेलांच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे. प्रतिकिलोला १५ रुपयांनी घट झाली आहे. महागाईचा आगडोंब उडाला असताना गृहिणींसाठी हा दिलासा मानला जातो. सर्वाधिक मागणी असलेल्या सरकी तेलानंतर सूर्यफुलाला मागणी असते. सध्या सरकी, सूर्यफूल आणि शेंगतेलाच्या दरातील केवळ ११ ते १३ रुपयांच्या फरकामुळे शेंगतेलालाही सध्या सर्वसामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे.

खाद्यतेलाचे दर (रुपये प्रतिकिलो)

तेल *सर्वोच्च दर *सध्याचा दर

सरकी *१६८ *१५५

सूर्यफूल *१७५ *१६६

शेंगतेल *१८० *१६८

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात गेली २० वर्षे सरकी तेलाला सर्वसामान्यांची पसंतीत उतरले आहे. दरातील फरक कमी झाल्यानंतरही सर्वाधिक सरकी तेलच खपते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेजी-मंदीवर खाद्यतेलाचे तर अवलंबून असतात. देशात ७० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते.

- राजेंद्र नटवरलाल लड्डा, राजेंद्र ट्रेडिंग कंपनी, सांगली

तेलघाण्यांना येणार महत्त्व...

आरोग्यांची काळजी घेणाऱ्या काही मोजक्या लोकांची लाकडी घाण्यावर काढलेल्या शेंगतेलाच्या खरेदीकडे वळताहेत. त्यासाठी त्यांची सध्याच्या दरापेक्षा किलोला १०० रुपये जादा मोजायची तयारी आहे. हा वर्ग वाढत गेला, तर शहरांसह खेड्यातील तेलघाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. खेडेगावात तेलघाणे आहेत. मात्र सध्या त्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT