40 boys-girls experienced childhood
40 boys-girls experienced childhood 
पश्चिम महाराष्ट्र

40 पोरं अनुभवताहेत बालपणीचा काळ सुखाचा

अजित कुलकर्णी

 सांगली : रस्त्यावरून हायफाय गाडी निघाली की पोरं असुयेनं, तिरस्कारानं बघायची. गेटबाहेर पार्क केलेल्या गाड्यांवर ओरखडे उठायचे. बागेतील फळांसह इतर चोऱ्या नेहमीच्याच. प्राणपणाने जपलेल्या गर्द वनराईची नासधूस व्हायची.

जाता-येता शिव्या देणारी पोरं पाहिली की हाडाचा शिक्षक असलेल्या सरांचं मन अस्वस्थ व्हायचं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम केलेल्या डॉ. नितीन नायक यांना हे चित्र बदलावं, असं मनोमन वाटायचं. सेवानिवृत्तीनंतर याला मूर्त स्वरूप आलं, अन्‌ पाहता-पाहता 40 कोवळी पोरं आज वाममार्गाला लागण्याच्या वाटेवरून संस्कारपथावर येताहेत. 

दररोज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत डॉ. नायक सरांचं वाघमोडेनगर (कुपवाड) येथील "मधुबन' फार्महाऊस बहरलेलं असतं. मोलमजुरी, शेतीसह छोटी-मोठ्या कामांसाठी पालक दिवसभर घराबाहेर. त्यामुळे मुलांना शिक्षण, संस्काराचा संबंध फक्‍त शाळेपुरताच. कोरोनाच्या भयामुळे शाळा बंद झाल्या. मुलं घरातच थांबली. पण संस्काराची वानवा. खेळताना शिवीगाळ, भांडणं नित्याचीच. 

डॉ. नायक यांना हे विदारक चित्र अस्वस्थ करायचं. मॅनेजमेंट क्षेत्रातील या बाप माणसांनं त्यांच्यात परिवर्तन घडवायचं मॅनेजमेंट केलं. त्यासाठी खोडकर, व्रात्य मुलांशी थेट मैत्री जोडली. त्यांच्यासाठी "मधुबन'ची दारे उघडली. तीन ते 15 वयोगटातील मुला-मुलींची ही संस्कारशाळा आज कोरोना काळातील एकाकीपण दूर करत आहे. चित्रकला, गायन, वादन, मैदानी खेळ, बागकाम अशा एक ना अनेक गोष्टीतून मुलं इथं रमताहेत. थिएटरमध्ये चित्रपट पाहून नाचगाणी करताहेत. फळांचा आस्वाद घेत तृप्तीची ढेकर देताहेत. बालपणीचा काळ सुखाचा अनुभवताहेत. 

पूर्वी वेळेअभावी फार्महाऊसवर येणे कमी असायचे. मॅनेजमेंट क्षेत्रातील उच्चशिक्षण घेणाऱ्यांना धडे देत होतो. आता सेवानिवृत्तीनंतर निसर्गाच्या सानिध्यात चिमुकल्या मनात संस्कार पेरताना त्याहून जास्त आनंद मिळतोय. मुलांना खेळताना, बागडताना पाहून मन पुन्हा बालपणात रमतेय. निरागस बालपण गैरमार्गाला जाण्यापूर्वी संस्कारशील बनवता बनवता दोघातील दरी आता मिटत आहे. 
- डॉ. नितीन नायक, सांगली. 

बहरलेल्या वनराईत साकारले थिएटर 
कुसळही उगवत नसलेल्या जमिनीवर डॉ. नायक यांनी ही वनराई निर्माण केलीय. साडेतीन एकरात करवंदापासून ते अव्हॅकडो या युरोपियन फळापर्यंत तब्बल 1555 झाडे आहेत. परिसरात हे एकच हिरवाईचं ठिकाण असल्यामुळे आत काय आहे, याची प्रत्येकाला उत्सुकता असते. कविवर्य मंगेश पाडगावकर, साहित्यिक विजय तेंडुलकर, अरुण साधू, अभिनेते सदाशिव अमरापूर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यासह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांचा मुक्‍काम येथे घडलेला आहे. गर्द हिरवाईत जुना बाज असलेले पण अत्याधुनिक थिएटर डॉ. नायक यांनी साकारलेय. हा त्यांचा प्रयोग खूपजणांना भावला आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT