41 Crores of funds for 159 pilgrimage areas
41 Crores of funds for 159 pilgrimage areas 
पश्चिम महाराष्ट्र

केल्याने तीर्थाटन, सोबत पर्यटन!

विनायक लांडे

नगर : जिल्ह्यात सर्वदूर व परिचित असलेल्या देवस्थानांची संख्या मोठी आहे. त्यातही अकोले तालुक्‍यात सर्वाधिक देवस्थाने आहेत. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून जिल्ह्यातील "क' वर्ग दर्जा मिळालेल्या 159 देवस्थानांना परिसर विकासासाठी गेल्या सहा वर्षांत 41 कोटी 50 लाख 26 हजार 740 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.


जिल्ह्यातील तीर्थस्थळांच्या ठिकाणी भाविकांचा ओघ वर्षभर सुरू असतो. अशा देवस्थानांचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधींच्या घरात असल्याने परिसर विकासासाठी ही देवस्थान स्वतः सक्षम असतात. त्यांना शासकीय मदतीची गरज नसते; मात्र ग्रामीण परिसरातील तीर्थस्थळांचे उत्पन्न त्या मानाने तुटपुंजे असते. भाविकांची तेथे वार्षिक यात्रेलाच मोठी वर्दळ असते. उत्पन्न कमी असलेल्या अशा देवस्थानांना "क' वर्ग दर्जा दिल्यानंतर जिल्हा नियोजन समितीने त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. शिवाय "क' वर्ग दर्जा देण्याचा अधिकारही जिल्हा नियोजन समितीला आहे.


खेड्यातील देवस्थानांच्या विकासासाठी 26 नोव्हेंबर 2012पासून तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू झाली. तीर्थक्षेत्राचा "क' वर्ग दर्जा मिळण्यासाठी निश्‍चित केलेले निकष पूर्ण करणाऱ्या देवस्थानांना निधी दिला जातो. 2013-19 या काळात जिल्ह्यातील एकूण 159 देवस्थानांना "क' वर्ग दर्जा जिल्हा नियोजन समितीने दिला. त्यात सर्वाधिक 29 तीर्थक्षेत्रे अकोले तालुक्‍यातील आहेत. त्याखालोखाल कर्जत येथे 24 देवस्थाने आहेत.
...
तालुकानिहाय तीर्थस्थळे
अकोले : 29
पारनेर ः 19
पाथर्डी ः 11
श्रीरामपूर : 4
श्रीगोंदे : 10
राहुरी : 4
राहाता : 07
शेवगाव ः 04
कोपरगाव ः 04
कर्जत ः 24
संगमनेर ः 10
नेवासे ः 16
नगर ः 13
जामखेड ः 04
....
वर्षनिहाय मंजूर निधी
2013-14 : 5,50,27,296
2014-15 : 8,01,07,187
2015-16 : 9,31,99,500
2016-17 : 7,32,03,757
2017-18 : 5,34,89,000
2018-19 : सहा कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT