Police-Bandobast
Police-Bandobast 
पश्चिम महाराष्ट्र

आषाढी वारीत सुरक्षेसाठी साडेपाच हजार पोलिस सज्ज

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. स्थानिक आणि बाहेरील असे एकूण साडेपाच हजार पोलिस वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिकमधील संस्थेकडून पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक येथील स्वयंसेवकांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या स्वयंसेवकांना कुंभमेळ्यातील गर्दी नियंत्रण करण्याचा चांगला अनुभव आहे. ते पोलिसांना प्रशिक्षणही देणार आहेत. तीर्थक्षेत्र पोलिस संकल्पना याअंतर्गत पंढरपुरात मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. वारीसोबतच पंढरपुरात हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्रपणे पोलिसांचे पथक कार्यरत राहील. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथकही असणार आहे. 

एकूण ४०० अधिकारी पोलिस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येत आहेत. जवळपास साडेपाच हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा सुरक्षेसाठी असणार आहे. गृहरक्षक दल आणि राज्य राखीव पोलिस बलाचे जवानही पोलिस बंदोबस्तास असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT