Railway
Railway 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर विभागातील 62 गाड्या दहा दिवस रद्द

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर व दौंड विभागातील वडशिंगे ते भाळवणी या 35 किलोमीटर अंतरावरील दुहेरीकरण व सिग्नल जोडणीची कामे (नॉन-इंटरलॉकिंग) सुरू आहेत. त्यामुळे 27 ऑगस्टपर्यंत सोलापूर विभागावरून धावणाऱ्या 62 रेल्वेगाड्या रद्द, तर 12 गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, 10 रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये इंटरसिटी एक्‍स्प्रेस 29 ऑगस्टपर्यंत, तर हुतात्मा व उद्यान एक्‍स्प्रेस 23 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

नागरकोईल-मुंबई, मुंबई-नागरकोईल, त्रिवेंद्रम-मुंबई, मुंबई-त्रिवेंद्रम, तिरुपती-मुंबई, मुंबई-तिरुपती, मुंबई-भुवनेश्‍वर, मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्‍स्प्रेस आणि भुवनेश्‍वर-मुंबई कोणार्क एक्‍स्प्रेसचे मार्ग 24 ऑगस्टपर्यंत बदलले आहेत. तर मुंबई-गदग, गदग-मुंबई, हैदराबाद-पुणे, पुणे-हैदराबाद, बंगळूर-मुंबई, मुंबई-बंगळूर उद्यान एक्‍स्प्रेस, मिरज-कुर्डूवाडी, कुर्डूवाडी-मिरज, एलटीटी- विशाखापट्टण, विशाखापट्टण-एलटीटी एक्‍स्प्रेस आणि निजामाबाद-पंढरपूर, पंढरपूर-निजामाबाद एक्‍स्प्रेस 24 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

रद्द झालेल्या प्रमुख गाड्या (कंसात कालावधी)
साईनगर-पंढरपूर, पंढरपूर-साईनगर एक्‍स्प्रेस (15, 18, 20, 22 व 25 ऑगस्ट), सोलापूर-कोल्हापूर, कोल्हापूर-सोलापूर (18 ते 22 ऑगस्ट), पुणे-सोलापूर, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस (20 ते 23 ऑगस्ट), सोलापूर-पुणे, पुणे-सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी) एक्‍स्प्रेस (17 ते 29 ऑगस्ट), हैदराबाद-मुंबई, मुंबई-हैदराबाद एक्‍स्प्रेस (16 ते 23 ऑगस्ट), सोलापूर-मिरज, मिरज-सोलापूर एक्‍स्प्रेस (18 ते 23 ऑगस्ट), भुवनेश्‍वर-पुणे व पुणे-भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस (20 व 22 ऑगस्ट), पुणे-सोलापूर व सोलापूर-पुणे डेमू पॅसेंजर (16 ते 29 ऑगस्ट), मुंबई-पंढरपूर व पंढरपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर (15 ते 18 व 22 ते 25 ऑगस्ट), मुंबई-विजयपूर, विजयपूर-मुंबई फास्ट पॅसेंजर (18 ते 22 व 25, 26 ऑगस्ट) या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT