Abhay Yojna for Water Supply of Solapur
Abhay Yojna for Water Supply of Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर महापालिकेची पाणीचोरांसाठी अभय योजना

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : अनधिकृत नळजोड घेऊन पाणी चोरणाऱ्यांसाठी महापालिकेने 15 अॅागस्टपर्यंत अंतिम अभय योजना जाहीर केली आहे. दहा हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळजोड नियमित करून घ्या असे या योजनेचे स्वरुप असणार आहे. 

सोलापूर शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत नळजोड असल्याचा आरोप वारंवार केला जातो. त्यात तथ्यही असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी अशा पाणीचोरांविरुद्ध मोहिम राबविली. त्यांनी पहिला हातोडा उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीतून
पाणी चोरणाऱ्यांवर लगावला. धक्कादायक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात मान्यवर म्हणून वावरणारे अनेक प्रतिष्ठित पाणीचोर निघाले होते. याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर हा विषय तिथेच थांबला.

जलवाहिनीवरील मोहिम संपल्यानंतर काळम-पाटील यांनी शहरातील पाणीचोरांविरुद्ध मोहिम राबविली. 21 ते 30 अॅागस्ट 2015 या कालावधीत 8 विभागीय कार्यालयांतर्गत राबविलेल्या या मोहिमेत 465 पाणीचोर आढळले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. ही बाब अद्यापही न्यायप्रविष्ठ आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी सर्व्हेक्षण केल्यावर शहराच्या अनेक भागात अजूनही अनधिकृत नळजोड असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हे नळजोड नियमित करण्यासाठी 15 अॅागस्ट 2018 मुदत देण्यात आली आहे.

नळजोड नियमित करण्यासाठी रितसर अर्ज, अनामत, मीटर चार्ज व कोटेशन मिळून दहा हजार रुपये दंड आणि नळजोड घेतलेल्या दिवसांपासूनची पाणीपट्टी भरून नळजोड नियमित करता येतील. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांविरुद्ध कोणतीही पोलिस कारवाई केली जाणार नाही. 

...तर फौजदारी कारवाई

15 आॅगस्टनंतर शहरात पुन्हा एकदा अनधिकृत नळजोड शोध मोहिम राबवली जाणार आहे. या कालावधीत जे अनधिकृत नळजोडधारक आढळतील. त्यांचे नळजोड त्वरीत बंद करण्यात येतील, शिवाय त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT