ad ujjwal nikam Testimony for sangli aniket kothale case
ad ujjwal nikam Testimony for sangli aniket kothale case 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ; कोठडीतील मृत्यूनंतर कामटेने केला थेट यांना फोन 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - अनिकेत कोथळे याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्यानंतर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा फोन आला असल्याची महत्वपूर्ण साक्ष सरकारी वकीलांनी न्यायालयासमोर दिली.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर आज अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी झाली. रकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास केला. त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. बचाव पक्षाने उलटतपास घेतला. उद्या (ता.4) सुनावणी होणार आहे. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, सांगली शहर पोलिसांनी लुटीच्या संशयावरून अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. अनिकेतचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळण्यात आला. याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याचे कामकाज पाहत आहेत. आजच्या सुनावणीत सरकारी वकील यांची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. 

साक्षीमध्ये ते म्हणाले,""घटनेनंतर रात्री 10.25 कामटे याचा फोन आला होता. आवाजावरून मी त्याचा फोन असल्याचे ओळखले. त्यानंतर फोन कट झाला. त्यानंतर रात्री पुन्हा 10 वाजून 58 मिनिटांनी फोन आला होता. त्यावेळी कोठडीतील आरोपींचा मृत्यू झाला आहे. बळाचा अधिक वापर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आणि फोन कट झाला.'' त्यांची साक्ष व उलट तपास पूर्ण झाला. बचाव पक्षातर्फे ऍड. प्रमोद सुतार, ऍड. दिलीप शिरगावकर, ऍड. शिरगुप्पे यांनी उलट तपास घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT