पश्चिम महाराष्ट्र

लाच वृत्ती मोडून काढण्यासाठी गुन्हा सिद्धता प्रमाण वाढविणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - लाच मागण्याची वृत्ती मोडून काढण्यासाठी गुन्हा सिद्धता प्रमाण वाढविण्यात येणार आहे. त्याकरीता तपासातील त्रुटी दूर करून भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे परिक्षेत्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर विभागाच्या अपर पोलिस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी सांगितले. 

अपर पोलिस अधीक्षक चव्हाण या आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लाच मागणाऱ्या विरोधात तक्रारी येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तरीही त्यात आणखी वाढ होण्याची आवश्‍यकता आहे. विभागाकडे लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार केली तर त्या कार्यालयातील काम होणार नाही अशी भिती तक्रारदाराला असते. पण तक्रारीनंतर संबधित कार्यालयीन काम पूर्ण करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवश्‍यक ते प्रयत्न केले जातात. इतकेच नव्हे तर एकाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केली असेल तर फक्त एक फोन करा, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तुमच्या दारात येऊन तुमची तक्रार घेतो. तातडीने त्यावर कारवाई करतो. कारवाईवेळी तक्रारादाराची रक्कम वापरली जाते. पण त्याला एका महिन्यात ती परत मिळून दिली जाते. शाळा महाविद्यालयापासून शासकीय कार्यालयापर्यंत लाच मागण्याच्या वृत्ती विरोधात तक्रारी द्या याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे.

लाचेची मागणी करणाऱ्यांना चपराक बसायची असले तर गुन्हा सिद्धता प्रमाण वाढवले पाहीजे. त्यासाठी विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी तपासातील त्रुटी जाणून घेऊन त्या पुढील गुन्ह्याच्या तपासात राहणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. याबाबतच्या सूचनाही विभागातील तिन्ही कार्यालयाला दिल्या असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावळी उपअधीक्षक गिरीष गोडे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT