Ahmednagar Farmer's Letter From Modi's Office
Ahmednagar Farmer's Letter From Modi's Office 
पश्चिम महाराष्ट्र

एेका ना मोदीसाहेब...नगरच्या शेतकऱ्याचं कसलं गाऱ्हाणंय वाचा

सकाळ वृत्तसेवा

राहाता ः तालुक्‍यातील केलवड येथील शेतकरी अनिल भाऊसाहेब दाते यांच्या तीन हेक्‍टर छत्तीस गुंठे शेतातून जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी सारखा न वाढविता एकाच बाजूला वाढविण्यात आला. त्यामुळे त्यांची अधिक जमीन त्यात गेली. अनधिकाराने हा रस्ता काढण्यात आला.

त्यामुळे मोठे नुकसान झाले. त्यांनी याबाबत पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली. दोन्ही कार्यालयांनी या तक्रारीची दखल घेऊन याबाबत चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

दाते यांनी सांगितले, की माझ्या शेतातून जाणारा हा रस्ता बेकायदेशीरपणे मोठा करण्यात आला. त्यामध्ये असलेली चार मोठी झाडेदेखील तोडली. हा रस्ता दोन्ही बाजूंना न वाढविता एकाच बाजूला वाढविला.

याबाबत राहाता पोलिस ठाण्यात व तहसील कार्यालयातदेखील तक्रार केली. मात्र, कारवाई झाली नाही. पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालय, तसेच वन विभागाकडून आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली. नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

आता जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी याबाबत योग्य कारवाई करावी. मला न्याय द्यावा, अशी मागणी दाते यांनी केली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT