Ahmednagar's tension has not diminished
Ahmednagar's tension has not diminished 
पश्चिम महाराष्ट्र

नगरकरांची धाकधुक वाढलीय... नेवाशातील त्या १० परदेशींचे रिपोर्ट अजून यायचेत

सकाळ वृत्तसेवा

नगर : नेवाशातील मशिदीत काल (सोमवारी) रात्री दहा विदेशी नागरिक आढळून आले. त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविले असून, त्याचा अहवाल उद्या (बुधवार) येणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश दिला आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षाही जास्त नागरिक रस्त्यावर दिसत नाहीत. कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत नाही ना, याची पडताळणी पोलिस प्रशासन करीत आहे. त्यासाठी शहरात व गावात विविध ठिकाणी गस्त घालण्याचे काम सुरू आहे. नेवाशात अशीच गस्त घालताना पोलिसांना एका मशिदीत 10 विदेशी नागरिक आढळून आले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. 

कोरोनाचा मोर्चा आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही वळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच "पॉझिटिव्ह' निघालेल्या विदेशी नागरिकांमुळे जामखेड तालुक्‍यातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जामखेड तालुक्‍यात घबराटीचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता आठवर पोचली असून, त्यांपैकी पूर्ण बऱ्या झालेल्या एकाला घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्ण जिल्ह्यात आहेत. या सर्वांना सध्या "आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात आले आहे. 

दोन विदेशी नागरिकांसह 14 जण मॉरिशस येथून दिल्ली येथे आले होते. त्यानंतर हा ग्रुप दोन आठवडे दिल्लीत थांबला. या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली, असा प्रवासही केला. विविध ठिकाणांना भेट दिली. शनिवारी (ता. 14) रेल्वेने हे सर्व जण नगरला आले.

मुकुंदनगरमध्ये राहिले

शहरातील मुकुंदनगर भागात राहिले. दुसऱ्या दिवशी ते जामखेडला रवाना झाले. तेथे ते 26 मार्चपर्यंत होते. मात्र, या व्यक्ती तेथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने या 14 जणांना ताब्यात घेत थेट जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांतील दोन जणांचे तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही शोध घेऊन जिल्हा रुग्णालयात आणले जात आहे. त्यांतील तीन जणांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने त्यांनाही "आयसोलेशन'मध्ये पाठविण्यात आले आहे. 
दरम्यान, मुकुंदनगर व जामखेड परिसर प्रशासनाने "सील' केला आहे. विदेशातून आलेले नागरिक जिल्ह्यातील बहुतांश लोकांच्या संपर्कात आल्याने, त्यांचाही कसून शोध सुरू आहे. नेवासे, संगमनेर, राहुरी येथील अनेक लोकांना तपासणीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. 

कोरोना पॉझिटिव्ह 
12 मार्च ः जिल्ह्यात पहिला रुग्ण 
19 मार्च ः जिल्ह्यात दुसरा रुग्ण 
24 मार्च ः जिल्ह्यात तिसरा रुग्ण 
29 मार्च ः आणखी दोन रुग्ण 
31 मार्च ः जामखेडमध्ये तीन रुग्ण 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वच्छता राखावी, विनाकारण घराबाहेर जाण्याचे टाळावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

कोरोना मीटर 
325 व्यक्तींची तपासणी 
08 पॉझिटिव्ह 
262 निगेटिव्ह 
52 अहवाल येणे बाकी 
355 होम क्वारंटाईन 
75 देखरेखीखाली 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT