sand
sand 
पश्चिम महाराष्ट्र

अक्कलकोट तहसीलदारांनी जप्त केला मोठा वाळू साठा

राजशेखर चौधरी

अक्कलकोट - अक्कलकोट तालुक्यात अनेक वेळा मोठी कारवाई तसेच सर्वच बाजूनी कोंडी करूनही न जुमानणाऱ्या वाळू चोरांनी, कोर्सेगाव येथील गावठाणात अवैधरित्या साठविलेले ७०० ब्रास वाळू तहसीलदारांनी ताब्यात घेतले आहे. कालपासून सुरू केलेल्या मोहिमेतून ताब्यात घेतलेले सर्व वाळू तडवळ येथील शासकीय विश्रामगृहात आणण्याचे काम सुरू आहे.दरम्यान नूतन तहसीलदार अंजली मरोड या रुजू होण्यापूर्वी दोन दिवस आधी पूर्वीचे तहसीलदार दीपक वजाळे यांनी जप्त केलेली वाहने पळविण्याचा प्रकार घडल्याने त्यांच्याविरोधात मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

वाळू चोरांची दहशत ठेचून काढण्यासाठी काल मंगळवार, ता. ४ पासून दिवस रात्र नदी काठच्या गावातील अवैध वाळू साठे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यातून कोर्सेगाव येथे ७०० ब्रास वाळू साठा गावठाणात आढळला आहे.तो सर्व वाळू आज दिवसभर तडवळ येथे आणण्यात येत आहे. 

एकंदरीत नदीकाठच्या शेगांव, आळगे, गुड्डेवाडी, धारसंग, मुंढेवाडी आदींसह अनेक गावात वाळूचे बेकायदेशीर साठे तहसिलदारांच्या पाहणीत आढल्याने एकंदरीत बेकायदेशीर वाळूसाठ जवळपास ३००० ब्रास इतका असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी वाळूचे साठे हे साठेबाजानी त्यांच्या स्वतःच्या शेतात किंवा जागेत न करता नाव कळू नये म्हणून गावठाण जागेत केलेला आहे.तो सर्व वाळू ताब्यात घेण्यात येणार आहे.या वाळू साठ्यावरील कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांनी प्रत्येक पथकात दोन पोलीस याप्रमाणे अक्कलकोट स्टेशन,सुलेरजवळगे आणि कोर्सेगाव अश्या तीन ठिकाणी बैठे पथक निर्माण केलेला आहे. ज्याद्वारे अवैध साठा केलेला वाळू तालुक्यातून बाहेर जाऊ नये अशी व्यवस्था केली आहे.

तालुक्यातील मागील जप्त वाळू साठ्यासाठी लिलाव पुकारला होता त्यावेळी नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.येत्या आठवड्यात पुन्हा सर्व जप्त वाळूचा लिलाव काढला जाणार आहे.ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी ७००० रुपये ब्रास याप्रमाणे रक्कम भरून वाळू खरेदी करावा. लिलावात भाग घेतलेल्यानी, जप्त केलेल्या जागेवरूनच वाळू साठा उचलावा त्यामुळे सर्वांची सोय होणार आहे. हा कायदेशीर मार्ग सोडून वाळूचा गैरमार्ग अवलंबल्यास त्यांच्यावर नियमाने कारवाई करू. यापुढे नदीकाठची वाळू चोरी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.
अंजली मरोड, तहसीलदार, अक्कलकोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT