Alert for Sangli disaster system for "Corona"
Alert for Sangli disaster system for "Corona" 
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोना'साठी सांगलीतील आपत्ती यंत्रणा दक्ष

सकाळवृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे सांगली जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यात "आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005', लागू झाल्याचे घोषित केले आहे. 

स्वतंत्र वैद्यकीय पथकांची तयारी... 

आपत्कालीन काळात विविध विभागांनी दिलेल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे व बिनचूक पार पाडाव्यात, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. चौधरी यांनी आदेश दिले आहेत. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, सर्व नगरपालिका यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता कृतिप्रमाणित कार्यपद्धती तयार करावयाची आहे. कोरोना विषाणू संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी उपाययोजना आखाव्यात. याबाबतीत आरोग्य विभागाने तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन करून माहिती पुस्तिकेचे वितरण सर्वदूर करावयाचे आहे. 
स्वतंत्र वैद्यकीय पथके पूर्ण वेळ तैनात ठेवावीत. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र ऍम्बुलन्स व्यवस्था, व्यापक जनजागृती करावी. दैनंदिन प्रगती अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. औषध विक्रेत्यांनी जास्त दराने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत गैरसमज आदी बाबी केल्याचे निदर्शनास आल्यास अन्न व औषध प्रशासनामार्फत तत्काळ आवश्‍यक कारवाई करावी. आवश्‍यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करावी. 

अफवा पसरवू नका... 

गृह विभागाने कोरोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, गैरसमज पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून अफवांवर नियंत्रण ठेवावे. 
महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुकास्तरावर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व औषध विक्रेते दुकानांची तपासणी करावी. औद्योगिक सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, रेडक्रॉस, लायन्स क्‍लब, रोटरी क्‍लब यांच्यासह सर्व सेवाभावी संस्थांनी आपापल्या स्तरावरून शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरांवर जनजागृतीचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात 100 ते 150 लोकांना विलगीकृत करण्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करावेत. मोठ्या खासगी व धर्मादाय रुग्णांलयांशी संपर्क करून विलगीकरण कक्ष स्थापन करावीत. 

अलगीकरण कक्ष सज्ज 

सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात अलगीकर कक्ष सज्ज करण्यात आलेत. सांगलीतील शासकीय रुग्णालयात दहा, तर मिरजेतील रुग्णालयात वीस बेडची क्षमता असणारे कक्ष तयार करण्यात आलेत. 

सनियंत्रक क्रमांक.. 

  • शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, मो.नं. 9822491591 
  • जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी मो.नं. 9766054156 
  • राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 
  • राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 

मोठे परिणाम 

चित्रपटाला फटका 
कोरोना बाधित रुग्ण सांगलीत नसला तरी नागरिकांकडून काळजी घेतली जात आहे. काही दिवसांत चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत दहा टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे सांगलीतील एका चित्रपटगृह व्यवस्थापकाने "सकाळ' शी बोलतांना सांगितले. दोन दिवसांपासून शहरातील सर्वच चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या कमी होतांना दिसते आहे. 

नाट्य संमेलनाबाबत चर्चा सुरू 

शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाच्या सोहळ्याबाबत काय निर्णय घ्यायचा यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. कोरोनाची स्थिती आणि या एकूण पार्श्‍वभूमीवर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सांगलीतील परिस्थितीची माहिती आम्ही वेळोवेळी मुंबईला कळवत आहोत, असे मराठी नाट्य परिषद सांगली शाखेचे अध्यक्ष श्रीनिवास जरंडीकर यांनी सांगितले. नाट्य संमेलनाबाबत धोरण ठरवताना नक्कीच कोरोनाच्या स्थितीचा विचार केला जाईल, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले. 

शाळा सुरूच राहणार 

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये सुरुच राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. शाळा बंद कराव्यात, अशी स्थिती जिल्ह्यात नाही. त्यामुळे तसा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी हेच दक्षतेबाबत काळजीचे वाहक आहेत, ते घरोघरी दक्षतेच्या सूचना देत आहेत, असे शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT