पश्चिम महाराष्ट्र

कोयना धरण क्षेत्रात सतर्क राहण्याचा इशारा 

सकाळवृत्तसेवा

सांगली  - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाची सद्य:स्थिती पाहता धरणाखालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन कोयना सिंचन विभाग, कोयनानगरचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे. त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ जूनपासून सलगतेने जास्तच पाऊस झाला आहे. सद्य:स्थितीत पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी  सुरू आहे. आज सकाळी आठ वाजता कोयना जलाशय पाणीपातळी ६४९.१२२ मीटर असून जलाशयामध्ये ६९.७८ टी.एम.सी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाच्या सांडव्याची माथा पातळी ६५०.२९१ मीटर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसाचे प्रमाण आणि येणारी पाण्याची आवक अशीच राहिल्यास अथवा वाढल्यास येत्या ४८ तासांमध्ये  सांडवा माथा पातळी ६५०.२९१ मीटर होण्याची  शक्‍यता आहे. 

सध्या सुरू असलेले पर्जन्यमान असेच चालू राहिल्यास जलाशय परिचालनाची निर्धारित पातळी राखण्यासाठी १८ जुलैपासून धरण पायथा विद्युतगृहातून जवळपास २१०० क्‍यूसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग केला जाईल. पुढील पर्जन्यमानानुसार १९ जुलैपासून सांडव्यावरूनही पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे. धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये  राहणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज मोटारी, इंजिन, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT