aaa.jpg
aaa.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

"राजकीय' वापराच्या  भीतीने "ते' स्पीकर उतरविले! 

धर्मवीर पाटील

इस्लामपूर - येथे ज्या गांधी चौक आणि गणेश भाजी मंडई परिसरात कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी लोकांमधील भीती कमी व्हावी यासाठी स्पिकरवरुन लोकांचे प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी मार्गदर्शनपर माहिती आणि प्रेरणादायी भजन आदींचा वापर केला जात होता. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची ही कल्पना होती. या स्पीकरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'मन की बात'चे प्रसारण शिवाय अन्य आवाहने केले जात होते. परंतु या भागातील लोकांचे हे प्रबोधन अल्पायुषी ठरले. अवघ्या चारच दिवसात पोलिसांना हे स्पीकर काढून ठेवावे लागले. 


सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे एकूण 25 कोरोनाबधित रुग्ण आढळल्याने अत्यंत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन येनकेनप्रकारेण उपाययोजना राबवून लोकांना दिलासा देण्यासाठी धडपडत आहे. गांधी चौक आणि भाजी मंडई परिसरातील रुग्णांच्या राहत्या घराच्या व व्यापाराच्या ठिकाणी जवळपास साडे सातशे मीटर एरिया पूर्ण सील केला असून त्यांचा आजिबात बाहेर संपर्क येणार नाही, अशी दक्षता घेण्यात आली आहे. 29 ते 31 मार्च दरम्यान शहर पूर्ण लॉकडाऊन केले असताना कोरोनाबधित परिसरात वीस फूट उंचीचे दोन मनोरे उभारले होते. चार स्पीकर बसवून त्याद्वारे लोकांचे प्रबोधन, जागरुकतेविषयी मार्गदर्शन, भजन आदींचा वापर करून लोकांच्या मनातून भीती निघून जावी, यासाठी प्रयत्न केले जात होते.

लोकांमध्ये त्यामुळे समाधानकारक भावना होत्या. मात्र या स्पीकरचा 'राजकीय' वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सावधगिरी म्हणून हे स्पीकरच काढून टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT