Election after
Election after sakal
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडी : एकापाठोपाठ एक उडणार निवडणुकांचे बार

नागेश गायकवाड

आटपाडी : आटपाडी तालुक्यात यंदाची सुरवातच सोसायटीच्या निवडणुकांनी झाली असून विकास सेवा सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती ते आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा एकापाठोपाठ एक वर्षभर धमाका उडणार आहे. अख्खं वर्ष तालुका निवडणुकांनी ढवळून निघणार आहे.

कोरोनामुळे विकास सेवा सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. सध्या कोरोनाची लाट ओसरल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तसं २०२२ हे वर्ष निवडणुकांनीच गाजणार आहे. अख्ख्या वर्षभर कोणत्या ना कोणत्या एकापाठोपाठ एक निवडणुका सुरू असणार आहेत. वर्षाची सुरवातच विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीने झाली होती. तालुक्यात ६९ विकास सेवा सोसायट्या आहेत. यातील कोरोनाच्या अगोदर पंधरा संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या.

राहिलेल्या सोसायट्यांच्या गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहेत. रोज एखाद-दुसऱ्या गावात सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. संस्थेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सध्या बाजार समितीवर प्रशासक आहे. २० जूनपर्यंत सर्व सोसायट्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करणे, हरकती मागवण्यासह निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण होते; मात्र नवीन पुनर्रचित आराखड्यानुसार पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समितीच्या गणांत निवडणुका जुलैमध्ये होऊ शकतात. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होईपर्यंत बाजार समितीच्या याद्या प्रसिद्ध होऊन निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान कधीही बाजार समितीच्या निवडणुका होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT