san_miraj_cime
san_miraj_cime 
पश्चिम महाराष्ट्र

जप्त डंपर पळवण्याचा प्रयत्न 

सकाळवृत्तसेवा

मिरज: वाळु तस्करांनी तलाठ्याचे अपहरण करण्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वाळूतस्करांनी मिरज तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार डंपरने धडक देऊन पाडले आणि वाळुने भरलेला डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. प्रचंड मोठा आवाज होऊनही तहसील कार्यालयातील सुरक्षारक्षक, शिपाई, कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची दखल घेतली नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 
किल्ला परिसरातील ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती; परंतु रात्री उशिरापर्यंत महसूल प्रशासनाचे मात्र कोणी अधिकारी अथवा कर्मचारी तहसील कार्यालयाकडे फिरकले नाहीत. काही दिवसांपूर्वीच वाळूतस्करांनी वाळूचा डंपर पळवताना एका तलाट्याचे अपहरण केले होते. यावेळी तहसीलदार रणजित देसाई यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल आणि पोलिस यंत्रणा त्या डंपरचा पाठलाग करत होती; परंतु इचलकंरजी फाट्यानजीक या वाळूने भरलेल्या डंपरचा टायर फुटल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा वाळूतस्करांनी अरेरावीचा हिसका महसूल प्रशासनाला दाखवला.

डंपर चालकाने थेट तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वारच डंपरची धडक देऊन पाडले; परंतु डंपर पडलेले गेट ओलांडून जाण्याच्या स्थितीत नसल्याने चालकाने पुन्हा डंपर जाग्यावर लावून तेथून पलायन केले. हा खेळ सुमारे अर्धा ते पाऊणतास सुरू होता; परंतु तरीही याकडे कोणी लक्ष दिले नाही. या घटनेची पोलिस आणि महसूल प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत दखल घेतली नव्हती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

Loksabha Election 2024 : हुकूमशहांकडे महाराष्ट्र देणार नाही ! ; उद्धव ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर डागली तोफ

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

SCROLL FOR NEXT