balasaheb.jpg
balasaheb.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आता शिवसेनेनं ठरवावं, भाजपच्या किती प्रभावाखाली राहायचं : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : आता शिवसेनेने ठरवायचे आहे की, त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, काॅग्रेसकडे प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ, असे महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष  वेगळ्या फाॅमुर्ल्यास तयार झाल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे थोरातांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झाली आहेत. सत्ता स्थापन करण्याची काहीही घाई नाही, योग्य वेळी निर्णय घेण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी वेगळीच आघाडी निर्माण होण्याबाबतही सध्या चर्चा हाेत आहे. याबाबत संगमनेरमध्ये आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ, मात्र त्याआधी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. भाजपाला घाबरायचे अथवा नाही हे आता सर्वस्वी शिवसेनेने ठरवावे. शिवसेनेचा निर्णय झाल्यास आम्ही आमच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची परवानगी घेऊ अशीही भूमिका थोरात यांनी मांडली.

दरम्यान, अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना आपल्यावर तीन महिन्यांपूर्वी राज्याची जबाबदारी काँग्रेसने टाकली, आपण ती पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न केला. संगमनेर मतदारसंघाला वेळ देता आला नाही. मात्र आपली निवडणूक कार्यकर्ते आणि जनतेनेच लढवली. त्यामुळे हा संगमनेरच्या जनतेचा विजय असल्याचेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT