Baligeri soldier shankar patil  Esakal
पश्चिम महाराष्ट्र

बाळीगेरीच्या जवानाचा अपघाती मृत्यू ; मृतदेह गावात येताच...

लोकापूरजवळील घटना ः शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

अथणी : तालु्क्यातील बाळीगेरी (Baligeri) येथील जवानाचा बागलकोट (Bagalkot) जिल्ह्यातील लोकापूरजवळ ट्रक-दुचाकी यांच्यातील अपघातात मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २६) रात्री ही घटना घडली. शंकर महालिंग पाटील (ShankarPatil)(वय ३२) असे मयत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात बाळीगेरी येथे शनिवारी (ता. २७) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, जवान शंकर पाटील हा २००८ साली सैन्यात भरती झाला होता. तत्पूर्वी गावातच प्राथमिक व माध्यमिक तर बारावीपर्यंतचे शिक्षण अनंतपूर येथे झाले. त्यानंतर तो सैन्यात भरती झाला. त्यानंतर बारा वर्षे जम्मू-काश्मीरला सेवा बजावली. मद्रासला देखील त्याची बदली झाली. तीन दिवसांपूर्वी तो सुटीवर आला होता. आपली सासूरवाडी बागलकोट जिल्ह्यातील सावशी येथे आपल्या पत्नीला आणण्यासाठी गेला होता. बेळगाव येथे खासगी कार्यक्रमास जावून परत सासूरवाडीस येत होता. शुक्रवारी (ता. २६) रात्री लोकापूरजवळ अपघातात त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह बाळीगेरीला आणण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या जवानांकडून मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

यावेळी केपीसीसी सदस्य चंद्रकांत इमडी, चिक्कोडी जिल्हा भाजपचे मुख्य सचिव निंगाप्पा कोकणे, महसूल निरीक्षक टी. जी. खतट्टी, तलाठी यु. केदनंदमनी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी सोमलिंग शंकरहट्टी, अशोक कवलगुड, बाबगौंड पाटील, लक्ष्मीबाई लोकूर, कुमार चन्नरेड्डी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. गावात अनेक ठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावले आहेत. तसेच शनिवारी (ता. २७) गावातील व्यवहार बंद ठेवले होते. शंकर पाटील याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

उपस्थितांचे डोळेही पाणावले

आपला मुलगा शंकर याचा मृतदेह गावात येताच आई यल्लव्वा हिने हंबरडा फोडला. मृतदेहाला कवटाळल्यावर तिच्यासह पत्नी सीमा हिच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी उपस्थितांना गहिवरून आले. मयत शंकर पाटील याच्या मागे वर्षा व दीक्षा नावाच्या मुली आहेत. त्यांचेही चेहरे पितृछत्र हरपल्याने दुःखाने केविलवाणे झाले होते. त्यांच्याकडे पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral

Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

SCROLL FOR NEXT