The band's salute was given to the doctors in Miraj 
पश्चिम महाराष्ट्र

इथल्या डॉक्‍टरांना दिली बॅंडची सलामी

सकाळवृत्तसेवा

मिरज (सांगली) : कोरोना साथीच्या संकटाचा पहिल्याच टप्प्यात समर्थपणे मुकाबला केल्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. ही दीर्घकाळ चालणारी लढाई असल्यामुळे आपणा सर्वांना यापुढे आणखी निकराने लढावे लागणार आहे, अशी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. यावेळी डॉक्‍टर, रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका, आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने विशेष गौरव केला. पोलिस बॅंडची सलामी देण्यात आली.

पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. विनोद परमशेट्टी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पोलिस बॅंडने वाजवलेल्या "हम होंगे कामयाब' सारख्या उत्साह वाढवणाऱ्या धून, शिस्तबद्ध आणि सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून आयोजित केलेल्या या छोटेखानी समारंभामुळे आज शासकीय रुग्णालयाचा परिसर तसेच तेथील सेवांना नवा आयाम मिळाला.

सतत लाठीकाठी आणि कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलिसांकडून शाबासकीची थाप मिळाल्याने शासकीय रुग्णालयातील सर्वच डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचारी भारावून गेले. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले,""पहिल्याच टप्प्यात कोरोनाग्रस्त बावीस रुग्णांना आपण बरे करून ही लढाई जिंकली. यासाठीचे रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका, आणि कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. यामुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि वैद्यकीय लौकिकात मोठी भर पडली. असे सांगितले.

पोलिस अधीक्षक शर्मा यांनीही आपल्या रुग्णालयातील डॉक्‍टर आणि सर्व अन्य सर्वांच्याच अथक प्रयत्न आणि प्रयोग परिश्रमामुळेच आपण पहिल्या टप्प्यातच करून विरुद्धची लढाई जिंकली आहे ही जिगर आम्हा पोलिसांचाही आत्मविश्वास वाढवणारी ठरली. त्यामुळेच आम्ही या छोट्याशा समारंभाचे आयोजन केले आहे.'' औपचारिकता टाळून जिल्हा पोलिस यंत्रणेने आयोजित केलेल्या या कौतुक सोहळ्यास रुग्णालयातील सर्वच डॉक्‍टर परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावलीच. 

डॉक्‍टरांना बॅंडची सलामी 
कोणाची पहिल्या टप्प्यातील लढाही जिंकणाऱ्या मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टरांसाठीच्‌ खास पोलीस बॅंड याठिकाणी आणल्याचे सांगताच रुग्णालयातील डॉक्‍टर परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT