Wine
Wine 
पश्चिम महाराष्ट्र

पानटपरीत अण्णा हजारेंचा फोटो लावून दारूविक्री

सकाळवृत्तसेवा

बीड - भ्रष्टाचारविरोधी चळवळ राबविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे छायाचित्र पानटपरीत लावून दारू व गुटख्याची सर्रास विक्री करणाऱ्या टपरीचालकास बीड ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी छापा टाकून पकडले. शहराजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील हॉटेलजवळच ही पानटपरी आहे.

पानटपरीत दर्शनी भागात अण्णा हजारे यांचा फोटो व त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबतचे प्रमाणपत्र लावलेले आहे. प्रत्यक्षात टपरीचालक लक्ष्मण मारुती बसवर (रा. बहिरवाडी, ता. बीड) अवैध दारू व गुटख्याची सर्रास विक्री करीत असल्याचे आढळले. ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी आज दुपारी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अवैध दारू व गुटखा असा दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याचे बल्लाळ यांनी सांगितले.

जनआंदोलन समितीचे विश्‍वस्त ऍड. अजित देशमुख यांनी याबाबत सांगितले, की टपरीवर सापडलेले प्रमाणपत्र भ्रष्टाचारविरोधी जनजागृती अभियान नावाचे आहे. त्याचा अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनाशी संबंध नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT