bjp
bjp sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव भाजपमध्ये फूट नाही

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी काँग्रेसला भाजपची ‘बी-टीम’ म्हणतात, तर काँग्रेस धजदला ‘बी-टीम’ म्हणते. प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांनी स्वतःला ‘बी-टीम’ म्हणून ओळखले असून, त्यात भाजपच ‘ए-टीम’ ठरली आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

बेळगाव दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.‌ यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजप ‘ए-टीम’ असल्याचा दावा केला. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत तीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्याप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही चारही जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे विधान परिषदेत त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढणार आहे.

बेळगाव भाजपमध्ये फूट नाही

बेळगाव भाजपमध्ये पडलेल्या फुटीबाबत त्यांना छेडले असता, अशी कोणतीच फूट भाजपमध्ये पडलेली नाही. विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून अरुण शहापूर आणि हणमंत निराणी हे मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वासही बोम्मई यांनी व्यक्त केला.‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT