belgum
belgum 
पश्चिम महाराष्ट्र

शाळेजवळ स्वछतागृह बांधण्याचे काम नागरिकांनी पाडले बंद   

मिलिंद देसाई

बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा सुधारणा समिती, पालक व कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करीत शाळेच्या जागेत स्वच्छतागृहासाठी सुरू असलेले बांधकाम शनिवारी बंद पाडले.

यावेळी काही नागरिकांनी परिसरात शौचालय नाही. त्यामुळे भाजी विक्रत्या महिला व नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे स्वच्छतागृहाची गरज असल्याचे सांगत बांधकाम करावे असे सांगत वाद घातला. जिल्हा पंचायत शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल व पालकांनी शाळेच्या आवारात स्वच्छतागृह बांधता येत नाही. तसेच स्वच्छता गृहामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बांधकाम होऊ दिले जाणार नाही असा पवित्रा घेतला, तसेच बांधकाम करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेतला होता असा प्रश्न विचारित काम बंद करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला.

त्यामुळे नागरिकांचा विरोध पाहून बांधकाम बंद करण्यात आले असून यापुढे शाळेची व शाळा सुधारणा कमिटीची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये अशी सूचना करण्यात आली. यावेळी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष जगनाथ गोंडाडकर एपीएमशी सदस्य महेश जुवेकर, राजू मरवे, हणमंत बाळेकुंद्री, कीर्तीकुमार कुलकर्णी, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, यलाप्पा नागोजीचे, शंकर चौगुले, बाळू गोरल आदी उपस्थित होते.         

स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनेक जागा आहेत. त्यामुळे शाळेच्या जवळ स्वच्छतागृह बांधण्यास सर्वांनी विरोध केला आहे. तसेच  नागरिकांचा विरोध कायम राहणार आहे.                            
- महेश जुवेकर, एपीएमशी सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT