पश्चिम महाराष्ट्र

लोकसभेसाठी काँग्रेसमधून इच्छुकांचा मुंबईत तळ

सकाळवृत्तसेवा

सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मंगळवारी झाली. त्यामध्ये माजी मंत्री प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांबाबत चर्चा झाली. पार्लमेंटरी बोर्डाचा अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे.  त्यामुळे दिल्लीतूनच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्यामुळे तेथील घडामोडीकडे लक्ष लागले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत भाजपने तो सर केला. पुन्हा एकदा तो काबीज करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळींनी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार कोण असावा? यासाठी नुकतीच जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. त्या बैठकीत माजी मंत्री प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील तसेच जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार विश्‍वजित कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील, नामदेवराव मोहिते यांच्या नावांची शिफारस केली गेली. त्यापैकी जिल्हाध्यक्ष कदम, विश्‍वजित कदम, जयश्री पाटील, विशाल पाटील यांनी लोकसभेला नकार दिला आहे. त्यामुळे प्रतीक आणि पृथ्वीराज पाटील यांच्यातच चुरस निर्माण झाली आहे.

मुंबईत पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत प्रतीक आणि पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर विश्‍वजित यांच्या  नावाचीही चर्चा झाली. चर्चेनंतर सांगलीची उमेदवारी कोणी लढवावी याबाबतचा अहवाल दिल्लीकडे पाठवला आहे. त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीचा फैसला दिल्लीहूनच होणार हे स्पष्ट झाले आहे. सांगलीची जागा काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याविरोधात काही मंडळी आक्रमक झाल्यामुळे काँग्रेसला येथे संधी असल्याचा अहवाल पार्लमेंटरी बोर्डाने पाठवला आहे. त्यामुळे राज्यातील पार्लमेंटरी बोर्डाला देखील सांगलीच्या जागेबाबत आशा वाटू लागली आहे. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे काँग्रेससह भाजपचेही दिल्लीतील हालचालीकडे लक्ष लागले आहे.

मुंबईत भेटीगाठी
मंगळवारी राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मुंबईत होती. त्यामुळे सांगलीतून इच्छुक असलेले प्रतीक व पृथ्वीराज पाटील आणि अन्य मंडळी मुंबईत तळ ठोकून आहेत. बैठकीबाबत गोपनीयता पाळली असल्यामुळे त्यातील चर्चेचा सूर समजण्यासाठी भेटीगाठी सुरू आहेत. परंतु, अहवाल केंद्राकडे जाणार असल्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT