miraj lab.jpeg
miraj lab.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

मोठी ब्रेकिंग : मिरजेच्या कोरोना लॅबमधील 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह

सकाळवृत्तसेवा

मिरज-जागतिक संकट बनलेल्या "कोरोना' साथीच्या रोगाची तपासणी करण्यासाठीची मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू झाली. या प्रयोगशाळेत गेल्या चोवीस तासात 24 नमुन्यांच्या तपासण्या झाल्या. त्याचे सर्व अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. दिल्लीतील "तबलिगी' मेळाव्यातील सहभागी संशयितांचा देखील यामध्ये समावेश आहे. या सर्व तपासण्या "इंडियन व्हॉयरॉलॉजी डिपार्टमेंट' च्या निकषास पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातील "कोरोना' बाधित रुग्णांच्या तपासणीचे अहवाल आता मिरजेच्या प्रयोगशाळेतून केवळ काही तासात प्राप्त होणार आहेत. 

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या या नव्या प्रयोगशाळेमुळे आता मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्राच्या लौकिकात मोठी भर पडली आहे. "कोरोना' साथीच्या निमित्ताने सुरू झालेली ही प्रयोगशाळा कोणत्याही संसर्गजन्य रोगांच्या जंतूची तपासणी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, मुंबईच्या जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या तिघांनी सातत्याने पाठपुरावा केला.

केवळ काही दिवसात या प्रयोगशाळेचे उभारणी करण्यात आली. त्यासाठीची यंत्रसामुग्री ही केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून युद्धपातळीवर खरेदी करण्यात आली. मिरज येथील शासकीय रुग्णालयाचे "कोरोना' रुग्णालयात रुपांतर होताच या प्रयोगशाळेच्या उभारणीस अधिक वेग आला. तीन दिवसापूर्वी या प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले आणि तेथे चाचणी स्वरूपात चार नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. या चारही तपासण्या पुणे आणि दिल्ली येथील "व्हॉयरॉलॉजी डिपार्टमेंट' च्या तज्ञांनी योग्य असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ही प्रयोगशाळा सुरु करण्यास अंतिम मान्यता देण्यात आली.

गेल्या 24 तासात या प्रयोगशाळेत एकूण 24 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या पैकी 14 नमुने हे सांगली जिल्ह्यातील होते. त्यामध्ये "तबलिगी' मेळाव्यातील लोकांशी संपर्क आलेले 11 जण होते. तसेच दहा रूग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील होते. या सर्व तपासण्यांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. सध्या या प्रयोगशाळेचे सर्व कामकाज डॉ विनिता कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली चालते आहे. डॉ. पल्लवी सापळे, डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. प्रकाश धुमाळ, डॉ.अनिल गुरव यांचेसह अन्य वरिष्ठ या प्रयोगशाळेच्या नियमित नियोजनामध्ये हे सहभागी आहेत. सध्या या प्रयोगशाळेत केवळ "कोरोना' चे नमुने तपासण्यात येत असले तरी भविष्यात अन्य संसर्गजन्य रोगांच्या नमुन्यांची तपासणी येथे शक्‍य असल्याचे सांगण्यात आले. या प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या संसर्गजन्य नमुन्यांची तपासणी होणार आहे. त्याचे नियंत्रण केंद्र सरकारच्या व्हॉयरॉलॉजी डिपार्टमेंटकडून होणार असल्याने याठिकाणी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातूनही तपासणीसाठी नमुने येऊ शकतात असेही महाविद्यालय सूत्रांनी सांगितले. 
 

अहवाल तंतोतंत जुळला- 
मिरजेत तपासलेले पहिले चार नमुने आणि नंतरचे दहा नमुने यांचे अहवाल निगेटिव्ह होते. त्याची दुसऱ्यांदा खात्री करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडून तपासण्यात आले. दोन्ही अहवाल तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरच ते अधिकृत जाहीर करण्यात आले. 
.............. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT