बेळगाव - शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असणाऱ्या मंगाई देवी यात्रेची तयारी जोरात सुरू असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी यात्रा कमिटी व महापालिकेतर्फे विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. तसेच मनोरंजनाच्या साधनांसह इतर व्यापारी देखील या ठिकाणी शुक्रवारपासून दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे यात्रा काळात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
मंगाई देवीची यात्रा मंगळवारी (ता. २६) रोजी पार पडणार असून कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यात्रा काळात विविध धार्मिक कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने पार पडले होते. परंतु यावेळी कोरोनाचे संकट कमी झाल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. याबाबतची तयारी गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिक करीत आहे. त्यामुळे वडगाव परिसरात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. तसेच यात्रेनिमित्त बकरी व कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असून विविध भागातून कोंबडी व बकरी विकणारी विक्रेते वडगाव परिसरात दाखल झाले आहेत.
यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार असला तरी चार ते पाच दिवस यात्रा भरते त्यामुळे मनोरंजनाच्या साधनांसह विविध प्रकारचे साहित्य विकणाऱ्या विक्री त्यांची देखील या ठिकाणी आतापासूनच गर्दी होऊ लागली असून योग्य ठिकाणी दुकान लावण्यास जागा मिळावी यासाठी व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच यात्रेच्या अगोदरच विक्रेते मोठया संख्येने वडगावात दाखल होऊ लागले आहेत.
यात्रेसाठी गाऱ्हाणे घालण्यात आल्यापासून वारादिवशी कुमारीका डोक्यावर पाण्याचा कलश घेऊन वडगाव परिसरातील विविध देव देवतांना पाणी वाहण्यासाठी मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. या कुमारीकाना शुक्रवारी यात्रा कमिटीच्या वतीने वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याचा हजारो विद्यार्थिनींना लाभ झाला आहे. यात्रेमुळे वडगाव परिसरात वर्दळ वाढली असून यात्रा शांततेत आणि सुरळितरित्या पार पडावी यासाठी प्रशासनाकडून वीज उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
देवीचा नवस फेडण्यासाठी यात्रे दिवशी लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. त्यामुळे भाविकांना दर्शन घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी मंदिर परिसरात विषय सोय केली जाणार आहे. तसेच प्रशासनातर्फे ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.