snake treatment.jpg
snake treatment.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळ्यात पक्षाच्या हल्ल्यातील  जखमी नागावर उपचार सुरू 

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली)- येथील सुजननगर परिसरामध्ये अज्ञात पक्षाच्या हल्ल्यामध्ये नाग जखमी अवस्थेत सापडलेल्या नागवर प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या वन्यजीव आपत्कालीन सेवे मार्फत उपचार सुरू आहेत. 


पक्ष्यांच्या हल्ल्यात एक नाग जखमी होऊन पडला होता. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ वन्यजीव आपत्कालीन सेवाला संपर्क करून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी संस्थेचे सदस्य प्रा. सुशील कुमार गायकवाड यांनी जखमी नागास ताब्यात घेऊन वन खात्यामध्ये माहिती दिली. त्यानंतर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले.

नाग जास्त प्रमाणात जखमी असल्यामुळे त्याला ठीक होईल पर्यंत डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तज्ञांच्या अभ्यासानुसार हा नाग साधारण एक वर्ष वयाचा आहे. तो जगण्याची चांगली शक्‍यता असल्यामुळे पुढील काही दिवस त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी उपचार करताना प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनचे सदस्य प्रणव महाजन, सुशिलकुमार गायकवाड, दिग्विजय गायकवाड, राज पाटील, स्वयंसेवक उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT