Vijay Singh Mohite Patil
Vijay Singh Mohite Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : मोहिते-पाटलांना भाजपत घ्या, पण उमेदवारी नको 

तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील असो की त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील असो यांना भाजपत घ्या, परंतु उमेदवारी देऊ नका, अशी विनंती माळशिरसच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सांगा, ते तुमची मागणी वरिष्ठ पातळीवर पोचवतील, असे उत्तर दिले. 

राष्ट्रवादीत संधी मिळत नसल्याने आणि आता मोदी लाट असून वातावरण भाजपच्या बाजूने आहे. या पार्श्‍वभूमीवर मोहिते-पाटील हे आता भाजपत येत आहेत. परंतु, माढा मतदारसंघातील माळशिरसह अन्य तालुक्‍यांत त्यांना मानणारा वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांना भाजपत घ्या, परंतु उमेदवारी देऊ नका, असा सल्ला त्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांना अशी विनंती केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रवादीच्या नेत्या रश्‍मी बागल, वेळापूरचे उत्तमराव जानकर, सांगोल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे त्यांचे निवडून येणे काही खरे नाही. त्यामुळे त्यांना पक्षात घेतले तरी उमेदवारी देऊ नये, अशी विनंती केल्याची चर्चा आहे. 

त्यांना कोण उमेदवारी देतो म्हणाले... 
माढा आणि सोलापूर लोकसभेचा उमेदवार हा मूळ भाजपचाच असेल. त्यामुळे मोदी लाट पाहून आणि भाजपच्या बाजूने सध्याचे वातावरण असल्याने दुसऱ्या पक्षातून भाजपत आलेल्याचा विचार करायचा की नाही, ते वरिष्ठ पातळीवरून ठरविले जाईल. त्यामुळे माढ्यातून मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळेल याची खात्री नाही. तुम्ही बिनधास्त राहा, याचा विचार आम्हीपण केला आहे, असे उत्तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT