Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सुशीलकुमारांना पाहून भाजपच्या महापौरांना अश्रू अनावर

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : सकाळी साडेनऊची वेळ.... महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जमलेले समस्त काँग्रेसजन...माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले आणि ते निघाले.. तेवढ्यात महापौर शोभा बनशेट्टी आल्या.. त्यांनी शिंदे पिता-पुत्रीना पाहिले आणि त्यांच्या अश्रुचा बांध फुटला. हे पाहिल्यावर उपस्थित सर्वांनाच गहीवरून आले.

महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषप्रयोगामध्ये महापौरांसह त्यांचे पती आणि इतर तिघांचा समावेश असल्याचा जबाब पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे हे पाचहीजण जबाब दिलेल्या दिवसापासून तणावात आहेत. त्यातल्या त्यात महापौरांचा धीरच सुटल्याचे वेळोवेळी जाणवले आहे.

महापौर बनशेट्टी यांचे आजेसासरे माजी महापौर दिवंगत विश्वनाथअप्पा बनशेट्टी हे सोलापूरच्या राजकारणातील बडे प्रस्थ. सर्वाधिक काळ नगरसेवक म्हणून काम करण्याचा त्यांचा विक्रम. बनशेट्टी कुटुंबिय ज्या शुक्रवार पेठेत राहतात तेथील ढोर गल्लीतच श्री. शिंदे यांचे बालपण गेले आहे. त्यामुळे बनशेट्टी कुटुंबियांशी शिंदे यांचे पूर्वीपासूनच कौटुंबिक संबंध आहेत. महापौर भाजपमध्ये असल्या तरी श्री. शिंदे व आमदार शिंदे यांच्यासमवेत त्यांचे नेहमीच  जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्याच्या ठिकाणी श्री. शिंदे यांना पाहिल्यावर महापौरांच्या अश्रुंचा बांध फुटला.

ते पाहिल्यावर आमदार शिंदे पुढे सरसावल्या. त्यांनी महापौरांना धीर दिला...मात्र महापौरांच्या अश्रुंचा बांध काही थांबेना. दोघांनाही नमस्कार करून त्या  महापालिकेतील कार्यक्रमास निघून गेल्या. त्यांच्यासमवेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रामेश्वरी बिरू आणि नगरसेविका संगीत जाधव याही होत्या. 

जीवे मारण्याचा कट रचल्याचा काँग्रेस नगरसेविकेचा दावा
नगरसेविका म्हणून कार्यरत असताना लोकप्रिय होत असल्याचे सहन न झाल्याने काँग्रेसमधीलच काहीजणांनी इतर पक्षातील नगरसेवकांना हाताशी धरून मला व माझ्या मेहुण्याला जीवे मारण्याचा कट रचला आहे, असे पत्र काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना दिले आहे. भाजपमधील विषप्रकरण चर्चेत आले असतानाच काँग्रेसमधील हे प्रकरण समोर आल्याने सोलापुरातील राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT