पश्चिम महाराष्ट्र

कोरा चेकही अडकवणार सावकाराला

सुधाकर काशिद

कोल्हापूर - खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी खासगी सावकारांचा पिच्छा सुरू केला आहे. ‘सावकाराविरोधात तक्रारी द्यायला पुढे या’, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खासगी सावकार आणि त्याने पोसलेल्या टोळक्‍यांना न घाबरता आता पिचलेल्या कर्जदाराकडून जबरदस्तीने किंवा व्याजापोटी घेतलेला एखादा कोरा चेक, स्टॅम्प पेपर जरी सावकाराच्या घरात सापडला तरी ते सावकाराच्या विरोधातील कारवाईला पुरेसे ठरू शकणार आहे. 

कोल्हापुरातल्या अनेक सावकारांनी कर्जदारांकडून सह्या करून कोरे स्टॅम्प, चेक घेतले आहेत. तारण म्हणून घर, वाहनाची कागदपत्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत. एवढेच काय अनेक दुचाकी चारचाकी वाहने सावकारांनी बेकायदेशीररीत्या त्यांच्या ताब्यात ठेवली आहेत. एखाद्या सावकाराच्या जागेत कर्जदाराचे वाहन आढळून आले तरी सावकारावर गुन्हा दाखल करण्यास पुरावा ठरू शकणार आहे.

खासगी सावकारी ही कोल्हापूर परिसरास लागलेली मोठी कीड आहे. अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी व दहशतीच्या जोरावर व्याजवसुली हा त्यांचा धंदा आहे. अतिशय निर्दयी पद्धतीने व्याजवसुली करून हे सावकार गब्बर झाले आहेत आणि त्या पैशाच्या घमेंडीवर त्यांनी समाजातल्या एका घटकाला वेठीस धरले आहे. मुद्दल नंतर द्या; पण महिन्याला व्याज पाहिजेच, या तंत्राने त्यांची वसुली सुरू आहे. मुद्दलापेक्षा दहापट व्याज वसुली केली तरी या सावकारांचे कर्ज फिटत नाही. अशी अवस्था आहे.

अनेकजण या सावकारीच्या पाशात अडकल्याने बरबाद होऊन गेले आहेत. दया माया हा शब्दच सावकारांच्या कोशात नसल्याने केवळ मग्रुरीवर हा व्याजवसुलीचा धंदा सुरू आहे.
सावकाराची दहशत इतकी असते, की दहशत निर्माण करण्यासाठी ते एखाद्या टोळक्‍याला पोसतात. ही टोळकी गुंड प्रवृत्तीची असतात. कर्जदाराच्या दारात त्यांना मुद्दाम पाठवले जाते.  आणि साऱ्या कुटुंबाला त्यांच्याकडून अस्वस्थ करून सोडले जाते.

आपल्या इभ्रतीला घाबरून कर्जदाराने मुद्दल राहू दे पण व्याज तरी द्यावे, यासाठी ही अघोरी पद्धत राबवली जाते. या दहशतीमुळे कर्जदार पोलिसांत तक्रार करायला घाबरतात. किंबहुना तो कर्जदार घाबरून जावा, यासाठीच हा दहशतीचा फंडा वापरला जातो. वास्तविक सावकार खूप शूर किंवा धाडसी नसतो. कर्जदार त्याला घाबरतो. त्यांच्या पुढे हात जोडतो. त्यामुळे सावकाराचा रुबाब वाढतो. आणि तो रुबाब केवळ पैशाच्या बळावरच असतो. एखाद्याने जरा धाडसाने तक्रार केली तरच सावकाराचा रुबाब उतरणे शक्‍य असते. 

सावकारांसह पाठीराख्यांची यादी
कोल्हापुरातील नामचिन सावकारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या सावकारांना पैशाचा पुरवठा करणारे फायनान्सर पाठीराखे यांचीही माहिती घेतली जात आहे. या सावकारांची घरे, त्यांची बसण्या-उठण्याची ठिकाणे यावरही लक्ष आहे. अमोल पोवार प्रकरणातील एक मोठी यादी पोलिसांकडे आहेच, आता आणखी एक यादी तयार होत आहे. तक्रार झाली की सावकाराची सालटे निघतील, अशी तयारी पोलिसांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT