Bottle Garden created from waste plastic in solapur
Bottle Garden created from waste plastic in solapur 
पश्चिम महाराष्ट्र

टाकाऊतून साकारले टिकाऊ 'बॉटल गार्डन' 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : मन प्रसन्न करणारे आणि हिरवेगार गार्डन तेही सरासरी दैनंदिन 40 ते 45 अंश सेल्सियस तापमानामध्ये... सुखद धक्का आहे ना... पण हे शक्‍य करून दाखविले आहे सोलापुरातील सुरेश नकाते या पर्यावरणप्रेमीने. त्यांनी चक्क टाकाऊ वस्तूंच्या साह्याने टिकाऊ अशा 'बॉटल गार्डन'ची निर्मिती केली आहे. 

वृक्षसंगोपनासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. त्याला प्रामाणिक प्रयत्न व तळमळीची जोड दिली तर तुम्हाला कुठेही हिरवळ निर्माण करता येऊ शकते. अगदी दाटीवाटीच्या आणि बोळात असले तरी चोवीस तास वर्दळ असलेल्या परिसरात हे हिरवाईने बहरलेले दृश्‍य येणा-जाणाऱ्यांना सुकाऊन जाते. विविध प्रकारच्या कुंड्यात आकाराला आलेली झाडे भर उन्हाळ्यातही फुलली आहेत, त्यांच्यातील तजेलपणा कायम आहे. 

हिरवाईने सजलेले हे गार्डन कायम बहरलेले राहण्यासाठी कारणीभूत ठरले ते कलात्मक पद्धतीने करण्यात आलेली व्यवस्था. केवळ झाडांची दाटीवाटीच नव्हे तर सामाजिक संदेशाचेही लिखाण येथील भिंतीवर करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धनाचे महत्त्व किती आहे हे श्री. नकाते यांनी आपल्या कृतीतून दाखविले आहे. झाडे लावायची म्हटले की प्रश्‍न येतो तो जागेचा, वेळेचा आणि ती जगविण्यासाठी लागणाऱ्या तळमळीचा. या सर्वांची सांगड घालण्यात श्री. नकाते यशस्वी ठरले आहेत. कुंड्यातील सर्व झाडांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी ते दक्ष आहेत. त्यामुळे जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यातही येथील सर्व कुंड्यातील झाडे अगदी टवटवीत आहेत. एकूणच एखादे काम मनापासून केले तर त्याचे किती सकारात्मक परिणाम दिसून येतात हेच श्री. नकाते यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 

डबे, बाटल्यांतून साकारल्या नक्षीदार कुंड्या -
शीतपेय, पाणी, सलाईनच्या बाटल्या, तेलाचे डबे, चॉकलेटचे डबे यांचा वापर करून कुंड्या तयार केल्या आहेत. या कुंड्यांना विविध प्राण्यांचे आकार देऊन त्यांच्यावर नक्षीकाम केले आहे. त्यामुळे या कुंड्या आकर्षक झाल्या आहेत. सर्व झाडांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे, इतकेच नव्हे तर एअर कंडिशनर यंत्रातून पडणारे पाणीही पाईप लावून झाडांना दिले आहे. 

वडील बागकाम करायचे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला व या "बॉटल गार्डन"ची निर्मिती केली. कोणत्याही कार्यक्रमाला गेलो की आहेर म्हणून रोप देतो आणि वृक्षसंवर्धनाची विनंती करतो, इतरांनाही याच पद्धतीचा आहेर देण्यासाठी प्रेरीत करतो. - सुरेश नकाते, पर्यावरण प्रेमी 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT