solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

वसुली आणा; अन्यथा पगार नाही 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : येत्या तीन महिन्यांत उद्दिष्टानुसार वसुली आणा; अन्यथा संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार केला जाणार नाही, तसेच वसुली आणण्यासाठी यश न आल्यास मीही पगार घेणार नाही, असा इशारा महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व खातेप्रमुखांना दिला. 

महापालिकेतील सर्व खातेप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी सर्वच खात्यांच्या वसुलीचा आढावा घेतला. महापालिकेच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत 24 कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी येत्या तीन महिन्यांत उद्दिष्टानुसार वसुली करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. 

गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत 280 कोटी 1 लाख 74 हजार 339 रुपये जमा होतात. या आर्थिक वर्षांत एप्रिल ते डिसेंबर 2018 अखेर 256 कोटी 52 लाख 65 हजार 968 रुपये उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 24 कोटी रुपयांनी उत्पन्न कमी आले आहे. त्यातच सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची देय रक्कम महापालिकेवर आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. 

स्थानिक संस्था कर, कर आकारणी, गलिच्छ वस्ती सुधारणा, हद्दवाढ, भूमी व मालमत्ता, मंडई, उद्यान, सार्वजनिक आरोग्य अभियंता, नगर अभियंता, आरोग्य विभाग, विभागीय कार्यालये, सामान्य प्रशासन विभाग, स्मृती मंदिर, क्रीडा, विधान सल्लागार, नागरी समुदाय विकास प्रकल्प आदी विभागांकडून अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. या सर्व विभागांना डिसेंबरअखेर 695 कोटी 60 लाख 23 हजार इतके उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात फक्त 256 कोटी 52 लाख 65 हजार रुपये म्हणजे उद्दिष्टाच्या 36 टक्केच उत्पन्न मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच खात्यांनी वसुली आणण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. 

...तर होईल कोट्यवधीची वसुली 
शहरातील काही भागांमध्ये मिळकत कर वसूल होत नाही. विशेषतः रामवाडी भागातील नागरिक तर जागा राजीव गांधींनी दिल्याचे सांगत, करच भरत नाहीत. याशिवाय, गावठाण भागातही काही ठिकाणी कर वसूल होत नाही. या ठिकाणी आयुक्तांनी पुढाकार घेऊन मोहीम राबविल्यास वसुली होऊ शकते आणि कर संकलन विभागाला दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तताही होऊ शकते, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT