बुलेट ट्रेन
बुलेट ट्रेन sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज उद्यानात धावणार बुलेट ट्रेन

सकाळ वृत्तसेवा

उद्यान हरिण, मोर, बदक, सांबर यासह अवाढव्या गोरीला हे प्राणी बाल गापोळांसह नागरिकांचे सेल्फी पॉईंट ठरत आहेत. सध्या गावगाड्यातील खेळ म्हणजे विटी-दांडू, लगोरी, फुगडी, दोरी उडी, कांदाफोडी, झिम्मा खिळणारे आकर्षक शिल्प उभारण्यात आले आहेत.

बाळगोपाळांचे खास आकर्षण असलेले बुलेट ट्रेनही मे महिन्यात सुरू केले जाणार आहे. यासाठी ठेकेदार नियुक्ती कंपनीकडे बुलेट ट्रेनचे काम देण्यात आले आहे. बुलेट ट्रेनमध्ये एकाचवेळी २० ते २५ नागरिक बसू शकतील. या ट्रेनसाठी १५ रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. खाऊ गल्लीसाठी ५४ गाळे बांधली जाणार आहेत. गाळे बांधकामांचेही काम सुरू होईल. खाऊ गल्लीमुळे उद्यानातील नागरिकांना विविध पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यामुळे मिरज शहराच्या सौंदर्यात भर पडेल. भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे एक पर्यटन स्थळ करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. हिरवी गर्द झाडी, विविध प्रकारचे फुलांची ताटवे यामुळे हा परिसर लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आकर्षित करणारा आहे. याच उद्यानाला आता एक वेगळी ओळख देण्याचे प्रयत्न नव्या शिल्प आणि विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीमुळे मिळणार आहे.

बुलेट ट्रेन, पथदिवे, वॉकिंग ट्रॅक, खाऊ गल्ली यासह कोल्हापूर कण्हेरी मठाच्या धर्तीवर प्राणी, पक्षी आणि गावगाड्यातील जुण्या खेळांचे शिल्प डॉ. आंबेडकर उद्यानात उभारले आहेत. यामुळे हे उद्यान सांगली-मिरज-कुपवाड पालिका क्षेत्रातील नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणार आहे.

- निरंजन आवटी, स्थायी समिती सभापती

मिरज शहरातील एकमेव सुस्थितीत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू लागले आहे. १८ लाखांचे शिल्प उभारून कोल्हापूर येथील कण्हेरी मठाच्या धर्तीवर बदल करण्यात आले आहेत. या ठिकाणी लवकर मे महिन्यात ट्रेन धावणार आहे.

- शंकर भोसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT