पश्चिम महाराष्ट्र

मराठा समाजाने दबाव निर्माण केल्यानेच प्रश्‍न मार्गी - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  मराठा समाजाने दबाव निर्माण केल्यानेच आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागला, असे प्रतिपादन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. जगाला मार्गदर्शन करतील असे मोर्चे निघाले. कोठेही दगड नाही, धावपळ नाही, असेही ते म्हणाले.

सकल मराठा समाजातर्फे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. उच्च न्यायालयाने १२ ते १३ टक्के मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मंत्री पाटील यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.  

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘१२ टक्के शिक्षणात व १३ टक्के नोकरीत आरक्षण मिळाले आहे. हा कायदा न्यायालयात टिकला याचा निश्‍चित आनंद आहे. ऋण नेहमी दुसऱ्याचे व्यक्त करायचे असतात. हा तर आनंदोत्सव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे ही माझी जीवननिष्ठा समजलो. एके काळी मराठा समाज श्रीमंत होता. त्यावेळी आरक्षण कोणी मागितले असते तर ते कोणाला पटलेही नसते. पण काळाच्या ओघात पाऊस कमी झाला. जमिनी गुंठ्यात विभागल्या गेल्या. एक काळ गावगाडा चालवणारा मराठा समाज अडचणीत आला. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली. काळच असा बदलला, की हा समाज दुसऱ्याला देणारा आहे, ही खोटी घमेंड आपण बाळगू शकत नव्हतो. वैद्यकीय प्रवेशातही आरक्षण देण्याची वेळ आली. त्यात जर आरक्षण नसते तर १४३ विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकला नसता. तो त्यांना या निमित्ताने मिळाला. युजीसीलाही चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना आरक्षण मिळाले. १३ टक्‍क्‍यांचा हिशेब केला तर साडेसहा हजार नोकऱ्या मराठा समाजाच्या मुलांना मिळतील. यासाठी राणे समितीनेही खूप फिल्डवर्क केले. डाटा एकत्रित केला. गोखले इन्स्टिट्यूटलाही कामाला लावले. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करणे कठीण काम होते. यासाठी राणेंनी मेहनत घेतली. इतिहासाचे दाखले कागदावर आणले. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठविला. आरक्षणात वर्तमानपत्रांची भूमिका महत्त्वाची ठरली. काही गोष्टी पडद्याआड घडत होत्या. त्यासाठी आम्ही भयानक मेहनत घेतली. राजकीय स्वार्थ पाहिला नाही. आता यापुढची जबाबदारी अधिक असून, गावोगावी कार्यालय उघडून सुविधा देणे आवश्‍यक आहे.’’

पडद्यामागच्या घडामोडीत श्रीराम पवारांचा वाटा
मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांचा मोठा वाटा राहिला. पडद्यामागील घडामोडी असो अथवा मुख्यमंत्र्यांशी बोलणे, यात श्री. पवार यांचा पुढाकार असायचा. आरक्षण मिळवण्याच्या कामी श्री. पवार यांचे मार्गदर्शन मिळाले, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT