पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजीतील जर्मन गॅंगवर दोषारोपपत्र सादर 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - इचलकरंजीतील जर्मन गॅंगवर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सहा संशयितांविरोधात पुण्याच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी चार मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण केली. 

अविनाश शेखर जर्मनी (वय 25), आकाश आण्णाप्पा भिलुगडे (वय 21), नईम हसन कुकुटनुर (वय 21), बजरंग अरूण फातले ऊर्फ बाचके (वय 22), प्रशांत विनायक काजवे (वय 24) आणि मनोज वामन शिंगारे (वय 23, सर्व रा. इचलकरंजी) अशी संशयितांची नावे आहेत. 

याबाबत उपअधीक्षक शेडे यांनी दिलेली माहिती अशी, जर्मन टोळीवर इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसात प्राणघातक हल्ला, गर्दी मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासात सात जणांवर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातील एक जण अल्पवयीन असल्याने तो सोडून अन्य सहा जणांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास शेडे यांनी पूर्ण केला. त्यानंतर गुन्ह्याबाबतचे दोषारोपपत्र विशेष मोका न्यायालयात सादर करण्याबाबत राज्य शासन मुंबईतील अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांची मंजुरी घेऊन ते पुण्यातील विशेष मोका न्यायालयात सादर केल्याचे शेडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT