पश्चिम महाराष्ट्र

बनावट सोन्याद्वारे मिरजेत कोट्यवधींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

मिरज - शहरातील आय.आय.एफ. एल. कंपनीकडे कर्जासाठी गहाण म्हणून दिलेल्या बनावट दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के पाहून पोलिसांसह सराफी व्यावसायिकही चक्रावलेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. हॉलमार्क शिक्‍क्‍यांचे बनावट दागिने गहाण ठेवून टोळीने सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील पतसंस्था, बॅंका, फायनान्स कंपन्या, खासगी सावकारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. याची पाळेमुळे मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या ठिकाणी असण्याची शक्‍यता पोलिस तपासून पाहात आहेत. हॉलमार्कचे बनावट शिक्के तयार करणाऱ्यांपर्यंत पोहोचणे पोलिस यंत्रणे समोरील मुख्य आव्हान आहे.

कर्नाटकातील कुडची येथील एका टोळक्‍याने मिरजेतील आय. आय. एफ. एल. कंपनीस बनावट दागिने देऊन कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. कंपनीने दागिन्यांची तपासणी केली असता हे दागिने बनावट असल्याचे सिद्ध झाले. आय. आय. एफ. एल. कंपनीने हे दागिने घेऊन येणाऱ्यांविरुद्ध फसवणुकीची तक्रार मिरज शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी मन्सूर ओमने (वय ५०, कुडची, जि. बेळगाव) याला अटक केली आहे. अन्य एक संशयित खलील संदलवाले फरारी आहे. एकीकडे हे प्रकरण गाजत असतानाच आय.आय. एफ. एल.  कंपनीतून असेच बनावट दागिने ठेवलेल्या कर्जदारांनी कंपनीचे पैसे देऊन दागिने सोडवून नेल्याचे पोलिस तपासांत स्पष्ट झाले.

पोलिसांनी आय. आय. एफ. एल. कंपनीस तीन महिन्यांतील व्यवहारांची कागदपत्रे पोलिसांकडे हजर करण्यास सांगितले आहे.  दागिन्यांवरील हॉलमार्कचे बनावट शिक्के निदर्शनास येताच पोलिसांनी काही सराफ व्यावसायिकांशी चर्चा केली. त्यांनाही हा प्रकार धक्कादायक वाटला. हा शिक्का परवानाधारक सराफ व्यावसायिकालाच मिळतो. त्या संदर्भातील नियम व अटी अतिशय कडक आहेत. त्याची बनावटगिरी हा मोठा फंडा असल्याचा संशय सराफ व्यावसायिकांना आहे.

हॉलमार्कचा शिक्का आणि दागिने तपासण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे सांगली, मिरज, कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी आणि अन्य खेड्यांतील खासगी सावकार तसेच पतसंस्था, बॅंका अशा अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाली आहे. या सर्वांनीच आता त्यांच्याकडील गहाण असलेले दागिने तपासण्यास सुरवात केली आहे.

दागिने विश्वासार्ह दुकानातून घ्या 
हॉलमार्कचा दागिन्यांवरील बनावट शिक्का हे प्रकरण गंभीर आहे. यात कोणीही सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. हॉलमार्कची अधिकृत नोंदणी असलेल्या विश्वासार्ह सराफ व्यावसायिकाकडूनच ग्राहकांनी दागिन्यांची खरेदी करावी, असे आवाहन  मिरजचे पोलिस उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT