कोल्हापूर - पोलिस मुख्यालयातील सिटिझन पोर्टलची जबाबदारी हाताळताना महिला पोलिस कर्मचारी.
कोल्हापूर - पोलिस मुख्यालयातील सिटिझन पोर्टलची जबाबदारी हाताळताना महिला पोलिस कर्मचारी. 
पश्चिम महाराष्ट्र

ज्येष्ठांना आधार ‘सिटिझन पोर्टल कक्षा’चा

राजेश मोरे

कोल्हापूर - तुम्हाला इंटरनेट हाताळता येत नाही, वयामुळे पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढता येत नसल्याने तक्रार देता येत नाही, तर घाबरू नका, पोलिस मुख्यालयातील ‘सिटिझन पोर्टल कक्ष’ तुमच्या सेवेला तयार आहे. ज्येष्ठांची तक्रार ऑनलाईन नोंदणी करून तपासाबाबतचे अपटेडचे संदेश मोबाईलवर प्राप्त करून देण्यास हा कक्ष आधार देतो.

मारहाण, शिवीगाळ, कौटुंबिक त्रास, छेडछाड याबाबतच्या तक्रारी आता पोलिस ठाण्यात जाऊन नोंदविण्याची गरज नाही. त्या आता थेट ‘सिटिझन पोर्टल’वर नोंदवता येते; मात्र त्यासाठी संगणक, मोबाईलवर इंटरनेट हाताळता आले की बस्स. आजही मोठ्या प्रमाणावर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होतात. त्याठिकाणी तक्रारीचे समाधान न झाल्यास उपअधीक्षक, अधीक्षकांपर्यंत तक्रारी घेऊन जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. मात्र प्रत्येकवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट होईलच याची शाश्‍वती नसते. त्यामुळे त्यांना तक्रारीचे निरसन होईलच असे नाही. अशावेळी ज्येष्ठांना दिलासा देण्याचे काम पोलिस मुख्यालयातील सिटिझन पोर्टल कक्ष मदतीला धावून येतो. या कक्षाची सुरुवात डिसेंबर २०१७ ला झाली. हा कक्ष पोलिस मुख्यालयात येणाऱ्या ज्येष्ठांच्या तक्रारीवर काम करतो. येथील महिला पोलिस कर्मचारी दीपाली डावखरे व पूजा गवंडी या तक्रारदारांना मदत करतात. त्यांच्या तक्रारी समजून घेऊन त्याची पोर्टलवर येथे नोंदणी केली जाते. त्यानंतर त्याचे अपटेड काय आहेत, याची माहिती मोबाईलवर कशी पाहायची याचीही माहिती ज्येष्ठांना दिली जाते. त्यामुळे तक्रारीवर पोलिसांनी कोणती दखल घेतली याची माहिती ज्येष्ठांना मिळण्यास मदत होते.

तक्रार नोंदणीसाठी आवश्‍यक 
 तक्रार अर्ज
 ओळखीचा पुरावा
 मोबाईल क्रमांक 

दृष्टिक्षेपात पोर्टल कक्ष 
 सिटिझन पोर्टलची सुरूवात - डिसेंबर २०१७
 गतवर्षी दाखल तक्रारी - ८२७
 निर्गत अर्ज - ७६४
 तपास कामातील अर्ज - ६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT