City cleaner that cleanses the SMC fund? MLA Shivendra Singh Bhojle
City cleaner that cleanses the SMC fund? MLA Shivendra Singh Bhojle 
पश्चिम महाराष्ट्र

शहर साफ करताय की पालिकेची तिजोरी? आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करीत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी (साविआ) विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगर विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सातारा पालिकेने सर्वसाधारण सभा एका महिन्यात घेणे बंधनकारक असतानादेखील नगराध्यक्षा माधवी कदम या त्याची काटेकोरेपण अंमलबजावणी करत नाहीत. त्या कर्तव्यात कसूर करत आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 81 चे उपकलम तीन अन्वये 15 दिवसांच्या आतील तारखेस सर्वसाधारण सभा घेण्याची कायद्यानुसार तरतूद करावी. तसेच नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (बुधवारी) जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावेळी आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते, विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांच्यासह नगरसेविका लीना गोरे, मनीषा काळोखे, कुसुम गायकवाड, दीपलक्ष्मी नाईक, सोनाली नलवडे, शकील बागवान, अतुल चव्हाण, रवींद्र ढोणे, शेखर मोरे आदी उपस्थित होते.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार भोसले बोलत होते. 
ते म्हणाले, "सातारा पालिकेत साविआकडून हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याने नागरिकांचे आणि शहराचे मोठे नुकसान होत आहे. सर्वसाधारण सभेसाठी विषयपत्रिका काढताना विरोधी नगर विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून सूचविलेले जाणारे जनहिताचे विषय वगळण्यात आले. सभागृहात विषयपत्रिकेवरील सर्व विषय बहुमताच्या जोरावर हुकुमशाही पद्धतीने तोंडी मंजूर म्हणून सभा लगेच गुंडाळतात. यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. स्वच्छतेच्या नावाखाली घंटागाड्यांचे महिन्याला सुमारे 19 लाख रुपयांचे बिल काढण्यात आले आहे. यापूर्वी हेच काम स्थानिक घंटागाडीवाले करीत असताना त्याचे सरासरी महिन्याला पाच लाख बिले असायचे. यामुळे सत्ताधारी शहर साफ करीत आहे का पालिकेची तिजोरी. पालिका निवडणुकीत आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे त्याही पलीकडे गेल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT