Education
Education 
पश्चिम महाराष्ट्र

सहा महाविद्यालयांत नवीन अभ्यासक्रम सुरू

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व कोरेगावमधील सहा महाविद्यालयांमध्ये शासनाकडून नव्याने १९ अभ्यासक्रम विषयांना मान्यता मिळाली आहे. यावर्षीपासून संबंधित महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून त्याच्या प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, नव्याने मान्यता मिळालेल्यामध्ये साताऱ्यामध्ये इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये एलएलएमला मान्यता मिळण्याबरोबरच यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बी.एस्सी.साठी एनसीसीला (ऐच्छिक) मान्यता मिळाली. 

शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकतेच राज्यातील महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम, विषयांना मान्यता दिली. त्याचा आदेशही नुकताच झाला. त्यात शिवाजी विद्यापीठातील १९ महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रम, विषयांना मान्यता मिळाली.

२०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालयांत सुरू करण्यात येत आहेत. त्यातील कऱ्हाडातील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात मान्यता मिळालेल्या दोन विषयांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाल्याचे महाविद्यालयाने कळवले आहे. त्यात साताऱ्यातील चार महाविद्यालयांचा, तर कऱ्हाड व कोरेगावमधील प्रत्येकी एका महविद्यालयाचा समावेश आहे. साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बी.एस्सी.साठी ऐच्छिक एनसीसीलाही मान्यता मिळाली आहे. 

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्समध्ये एम.कॉम.च्या पहिल्या वर्षासाठी ॲडव्हान्स अकौंटन्सी विषयास, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षासाठी फिजिकल, केमिस्ट्री, ॲनॅलिटिकल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक केमिस्ट्री तसेच बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षासाठी एनसीसीची सोय उपलब्ध झाली आहे. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात एम.कॉम.च्या पहिल्या वर्षासाठी बॅंक मॅनेजमेंट विषयास मान्यता मिळाली. त्याशिवाय इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉजेजमध्ये एलएलएमची सोय उपलब्ध झाली असून डिप्लोमा इन सायबर तसेच डिप्लोमा इन टॅक्‍सेशन या अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे.

कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये एम.एस्सी. भाग एकच्या ॲनॅलिटिकल केमिस्ट्री विषयास तसेच एम.कॉम.च्या पहिल्या वर्षासाठी ॲडव्हान्स अकौंटन्सी, एमएच्या पहिल्या वर्षासाठी अर्थशास्त्र, भूगोल, इंग्रजी या विषयांना तसेच बीकॉमच्या तिसऱ्या वर्षासाठी ॲडव्हान्स बॅंकिंग ॲण्ड फायनान्शियल सिस्टिम, बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षासाठी बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजीसाठी मान्यता मिळाली. कऱ्हाडमध्ये सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षासाठी फिजिक्‍स व ॲनॅलिटिकल केमिस्ट्री विषयास मान्यता मिळाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT