Complaint to the police commissioner for defying the great men
Complaint to the police commissioner for defying the great men 
पश्चिम महाराष्ट्र

महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेत सिंहासनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दाखवून दोन्ही महापुरुषांची विटंबना केल्याप्रकरणी पी. बी. ग्रुप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवारी सोलापुरातील शिवप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना देण्यात आले आहे. 

निवेदन देण्यासाठी शेकडो शिवप्रेमी पोलिस आयुक्तालयासमोर एकत्र जमले होते. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त तांबडे यांची भेट घेवून निवेदन दिले. मिरवणूकीतील हा प्रकार जाणिवपूर्वक व खोडसाळपणे केल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. या देखाव्यामुळे समस्त शिवप्रेमी व दलित बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या कृत्यामुळे सोलापुरातील शांतता, सुव्यवस्था बिघडण्याची शक्‍यता आहे. पी. बी. ग्रुप मंडळाचे पदाधिकारी गेल्या दोन महिन्यापासून शहरातील शांतता बिघडवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहे. पी.बी.ग्रुपचे पदाधिकारी व मूर्तीकारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे. 
निवेदन देतेवेळी शिवप्रेमी राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, दिलीप कोल्हे, चेतन नरोटे, दास शेळके, तुकाराम मस्के, पद्माकर काळे, माऊली पवार, महेश भोसले, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, राजू आलुरे आदी उपस्थित होते. 

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल शिवप्रेमींचे निवेदन प्राप्त झाले आहे. याप्रकरणात कायद्यानुसार जे काही करता येईल ते करण्यात येईल. फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. तरुणांनी या विषयावरील कोणत्याही पोस्ट सोशल मीडीयावर शेअर करू नयेत. कोणालाही कायदा हातात घेवू देणार नाही. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT