Confidence, success depends on effort: Opinion of Prasad Chowgule, who came first in the state in the Public Service Commission examination 
पश्चिम महाराष्ट्र

आत्मविश्वास, प्रयत्नावर यश अवलंबून : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रसाद चौगुलेंचे मत 

गोरख चव्हाण

प्रश्न ः स्पर्धा परीक्षा विषयीची प्रेरणा आपल्याला कोठून मिळाली? 
प्रसाद चौगुले ः जवाहर नवोदय विद्यालयातील जीवनात स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्‍यक ज्ञानाचा पाया भक्कम झाला. पुण्यामध्ये एका कंपनीत नोकरी करताना मित्रांच्या रूमवर येणे-जाणे होते. काही मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करीत. परिक्षांची माहिती घेतली. आपणही यशस्वी होऊ, असा विश्‍वास निर्माण झाली. 

प्रश्न ः चांगल्या कंपनीतील नोकरीची स्थिरता सोडून स्पर्धा परीक्षांकडे कसे आकर्षित झाला. 
प्रसाद चौगुले : नोकरी सोडताना निश्‍चितच दबाव होता. स्पर्धा परीक्षा हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. प्रशासकीय सेवेत जायचं ध्येय होतंच. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुणे येथे चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर काम करत असतानाच स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन तयारीला सुरवात केली. आई-वडील, भाऊ आणि भाऊजींचे सहकार्य मिळाले. 

प्रश्न ः गेम प्लॅन काय होता? 

प्रसाद चौगुले ः परीक्षांचा अभ्यासक्रम जाणून घेऊन प्रश्नपत्रिकांचे विश्‍लेषण केले. वर्षाचा गेम प्लॅन तयार केला. पूर्व परीक्षेच्या अगोदर मुख्य परीक्षेची तयारी केली. त्यामुळे पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी जास्तीचा वेळ मिळाला. उजळणीही झाली. बेसिक तसेच राज्य, केंद्रीय अभ्याक्रमांच्या पुस्तकामुळे भरपूर फायदा झाला. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची खोली पाहून अचूक संदर्भग्रंथ व विश्‍लेषण करण्यावर भर दिल्यास यश मिळू शकते. 

प्रश्न ः ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल ? 
प्रसाद चौगुले : स्पर्धा परीक्षेसाठी खासगी क्‍लास पाहिजे असे नाही. स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला योग्य मार्गदर्शक मिळणे महत्वाची बाब आहे. कारण तुम्हाला अभ्यास करायचा असतो, पाठांतर नाही. ग्रामीण वा शहरी स्पर्धा परीक्षेत सगळ्यांना सारखेच नियम आहेत. परीक्षेची तयारी झोकून देऊन करावी लागते. आत्मविश्वास व प्रयत्नावर यश अवलंबून असते. ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची पूर्ण माहिती घेऊनच पाऊल टाकावे. 

प्रश्न : संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहात ? 

प्रसाद चौगुले ः निश्‍चित. माझे स्वप्न भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचेच आहे. ते निश्‍चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT