पश्चिम महाराष्ट्र

रब्बी पिक विमा प्रस्तावाच्या पुन्हा पडताळीने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - जिल्ह्यातील रब्बी पिक विमा भरलेल्या तीन लाख पाच हजार शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचे चुकीचे प्रस्ताव सी.एस.सी संचालकांनी भरल्यामुळे या प्रस्तावाची पडताळणी करमार असल्याचे कळाल्याने शेतऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात भरपाई मिळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठी जिल्ह्यातील खरीप आणि पीक विमा भरणाऱ्यां माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर भरावी लागत असल्याने नेहमीच बँकीग कामामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी पिक विमा भरून घेण्यास टाळाटाळ केली. शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सीएससी चालकाकडे भरावे लागले. पण चालकांनी शेतकऱ्याकडून काही रक्कम घेत हे प्रस्ताव ऑनलाईन करताना सातबारा वरील नाव आणि आधार, कार्ड बँक पुस्तक यांची व्यवस्थित पडताळणी करून घेता त्यांच्या चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याची माहिती संकेतस्थळावर अपलोड केली. 

सध्या विमा कंपनीने या माहितीची पडताळणी चालू केल्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर तसेच संदेश प्राप्त झालेले आहे. ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल क्रमांक नाही त्यांनी यांचा मोबाईल क्रमांक नोंदलेला आहे. त्यामुळे त्याचे चुकीच्या पडताळणीचे संदेश त्यांना गेल्यामुळे संबंधित विभागाकडे जाताना शेतकऱ्याची दमछाक होत आहे. तर काहींचे मोबाइल 35 रुपये चा रिचार्ज मुळे बहुतांश बंद असल्याने विमा प्रस्तावाचे काय झाले याबाबत संभ्रमात आहेत. 

विमा प्रस्ताव दाखल करताना सीएससीच्या जिल्हाप्रमुखांनी प्रशिक्षण देणे आवश्यक होते परंतु तसे पद्धतीचे प्रशिक्षण न दिल्यामुळे शेतकऱ्याकडून ठराविक रक्कम चुकीचे प्रस्ताव अपलोड केल्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा त्रास होत आहे.यामध्ये विमा कंपनीचा काहीही संबंध नसून चुकीचे प्रस्ताव भरल्यामुळे आम्ही त्याची पडताळणी करीत आहोत त्यानंतर नेमके किती शेतकऱ्याचे प्रस्ताव चुकीचे झाले याची माहिती उपलब्ध होणार आहे तोपर्यंत काहीच माहिती देऊ शकत नाही मात्र या सर्व गोष्टीला चालकच जबाबदार असल्याची माहिती बजाज विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राष्ट्रीयकृत बँकेने प्रस्ताव नाकारल्याने सी.एस.सी चालकाकडे प्रस्ताव भरला परंतु प्रस्तावच्या पडताळणीबाबतचा संदेश प्राप्त झाल्याने पुन्हा कागदपत्रे घेऊन जाण्याची वेळ आली विम्यासाठी काम कमी दमणूक ज्यादा 
- दिलीप पाटील शेतकरी नंदेश्वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT