आरेवाडी ः येथील बिरोबा बनात गजनृत्याचे चित्रीकरण करताना.
आरेवाडी ः येथील बिरोबा बनात गजनृत्याचे चित्रीकरण करताना. 
पश्चिम महाराष्ट्र

Video : लोककला संवर्धनासाठी बिरोबा बनात गजनृत्याचे चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा

ढालगाव - आरेवाडी येथील बिरोबा बनात शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाच्यावतीने लोककलेचे संकलन आणि संवर्धनासाठी गजनृत्य कार्यक्रमाचे चित्रीकरण घेण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने लोककलेचे सवंर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लोककलेमध्ये जागर, गोंधळ, तमाशा, लावणी, शाहिरी, भेदिक, गजनृत्य, जात्यावरची ओवी, ओव्या आदी लोककलेचे संकलन आणि संवर्धन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची, विचारांची आणि लोककलावंताची भूमी म्हणूनचं नावारूपाला आलेली आहे. याच पारंपरिक लोककलेन मनोरंजना बरोबर प्रबोधनही केले आहे. मात्र या जिवंत लोककलेचे संकलन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याने शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे. प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी मत व्यक्त केले.  

प्रथमचं आरेवाडी येथील बिरोबा बनात गजनृत्य, ओव्या काही महिलांची गीत संकलित केले. त्याचं बरोबर सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील पारंपरिक लोककलांचे जितके संकलन करता येईल तितके मोठ्या प्रमाणात संकलित केले जाणार असल्याचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी सांगितले.

गजनृत्य पारंपारिक लोककला संकलित करण्यासाठी प्रा. तेजस चव्हाण, प्रा. आप्पासाहेब बुडके, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे, प्रा. लोमेश कोळेकर आणि जगन्नाथ कोळेकर व बिरोबा देवस्थान समितीचे  सर्व पदाअधिकारी यांनी विशेष सहकार्य केल्याने गजनृत्य कला संकलित करण्यासाठी मदत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT