cooperation minister blaming co-operative bank
cooperation minister blaming co-operative bank  
पश्चिम महाराष्ट्र

दिरंगाई झाकण्यासाठी सहकारमंत्र्यांचे बँकांवर खापर 

तात्या लांडगे

सोलापूर : शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी भरलेल्या माहितीचे गावोगावी चावडी वाचन झाले. बँकेंतर्गत कार्यरत असलेल्या विकास सोसायट्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती लेखापरीक्षकांकडून तपासण्यातही आली. तरीही बँकांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला. केवळ सरकारची दिरंगाई लपविण्यासाठी सहकारमंत्री बँकांवर खापर फोडत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजन पाटील यांनी केला. 

पारदर्शकतेच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरायला लावले. तत्काळ कर्जमाफीच्या आशेने त्यांनीही ते भरले. आता वर्ष झाले तरीही बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ते सरकारचे अपयश असून सध्या शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. तत्पूर्वी नोटाबंदी, जीएसटी, महागाई वाढ, शेतीमालाचे घसरलेले दर, वाळूटंचाईमुळे निर्माण झालेली बेरोजगारी यामुळे सध्या जनतेत सरकारविरोधी प्रचंड नाराजी पसरली आहे. 

त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला बसू नये, या उद्देशाने सहकारमंत्री खोटी माहिती देत आहेत. असे पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 
शेतकऱ्यांनी भरलेल्या माहितीच्याआधारे आणि लेखापरीक्षकांच्या पडताळणीनुसार बँकेने शेतकऱ्यांची माहिती सरकारला पाठविली. त्यानंतर बँकांकडून त्रुटी असलेली माहिती पुन्हा दुरुस्ती करून घेतली. त्रुटी असलेली माहिती त्यांचे स्वॉप्टवेअर स्वीकारतच नव्हते. तरीही चुकीची माहिती सरकारला कशी पोहचली, असा सवालही त्यांनी सहकारमंत्र्यांना केला. 

कर्जमाफीला आता वर्ष झाले असून मागील तीन-चार महिन्यापासून ती ठप्पच आहे. त्यामुळे लबाडाचे आवतण खाल्याशिवाय खरे नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांची नाराजी आपल्यावर येऊ नये म्हणून सहकारमंत्र्यांनी बँकांवर खापर फोडले आहे. नोटाबंदीनंतरही असाच संशय घेतला. परंतु, पाचवेळा चौकशी करुनही काहीच हाती लागले नाही. खोटे बोलण्याचा फटका त्यांना सोलापूर बाजार समितीत बसल्यानंतरही ते पुन्हा खोटे बोलत आहेत. त्यामुळे त्याचा आगामी निवडणुकीत आणखी फटका बसेल. 

-राजन पाटील, तत्कालीन अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT