Corona affected life of folk artists
Corona affected life of folk artists 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना इफ्फेक्ट : वाघ्या मुरळी, लोककलाकारांची उपासमार

सकाळवृत्तसेवा

सांगली : कोरोनामुळे सर्वच क्षेत्राचे आर्थिक नुकसान होत असताना लोककलावंताची उपासमार होत आहे. विवाहासारख्या शुभ कार्यात गोंधळ जागरण करण्याची परंपरा जोपासणाऱ्या वाघ्या मुरळी कलावंतांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे लग्नसमारंभच रद्द झाल्याने या लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. 

याबाबत राज्य वाघ्या मुरळी परिषदेचे कार्याध्यक्ष विशाल दळवी यांनी कलाकारांना मानधन मिळावे अशी मागणी केली आहे. कोरोना या न दिसणाऱ्या विषाणूमुळे देश लॉकडाऊन झाला आहे. उद्योग, व्यापार थांबला आहे, शिक्षण थांबले आहे, कष्टकऱ्यांचा रोजगारही थांबला आहे. यात लोककलावंताची परवड होत आहे. वाघ्या मुरळी या कलेवरच ज्यांचा संसार आहे,अशा कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

या लोककलाकारांना मानधन मिळावे, शासनाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य वाघ्या मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे, कार्याध्यक्ष विशाल दळवी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अंगद चौधरी, सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश माने असे सर्वजण शासन दरबारी प्रयत्न करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी लोककलाकारांची संघटना बांधत आहेत. 

हजारो कलाकार 
याबाबत श्री. दळवी म्हणाले,""विवाहानंतर कुलदेवतेचे स्मरण व्हावे यासाठी गोंधळ घातला जातो, यासाठी वाघ्या मुरळी लोककलावंताना बोलवले जाते, या कलेला 400ते 500 वर्षांचा इतिहास आहे. यासाठी लोककलावंताना मानधन दिले जाते. एका कार्यक्रमासाठी चार ते पाच हजार रुपये मिळतात. विवाहाचे मुहूर्त ज्या दोन-तीन महिन्यांत असतात, त्या काळात सुमारे शंभर कार्यक्रम होतात, सांगली-सातारा-कोल्हापूर जिल्ह्यात मिळून सुमारे वाघ्या मुरळीचे 500 ताफे आहेत. प्रत्येक संघात वाजंत्री, टाळवाला, खंजिरी असे 8 ते 10 लोक असतात. सुमारे 1000 ते 1500 लोककलावंताना रोजगार देणारी ही कला आज कोरोनामुळे थांबली आहे. शासनाने ही कला जिवंत ठेवावी यासाठी मदत करावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT